डोंबिवली - गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याने आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.