डोंबिवली - लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपाचे काम न केल्याचा राग असल्याने येथील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना भाजपाचे माजी मंत्री कपिल पाटील विधानसभेत साथ देणार नाही असे बोलले जात आहे. त्यातच भाजपाचे वरूण पाटील हे बंडखोरी करत उभे राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गट व मनसेचे उमेदवार देखील रिंगणात असल्याने भोईर यांना ही निवडणूक जिंकणे कठीण झाले आहे.