बोगस लसीकरणाप्रकरणी 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

corona vaccine
corona vaccinesakal media
Updated on

मुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटी येथे 390 व्यक्तींचे बोगस लसीकरण केल्याप्रकरणी पोलिसानी शिवम रुग्णालयाच्या मालकासह 11 जणांविरोधात महानगर दंडाधिका-यांकडे शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. 30 मेला हे बोगस लसीकरण झाले होते.दोन हजार पानांचे हे आरोपपत्र असून त्यात 500 व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. बोरीवली दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ( Mumbai news )

महेंद्र प्रताप सिंग(39), संजय विजय गुप्ता(29), चंदन रामसागर सिंह(32), नितीन वसंत मोदेहा(32), मोहम्मद करीम अकबर अली(19), गुडीया रामबली यादव(24), डॉ. शिवराज छोटुलाल पटारिया(61), नीता शिवराज पटारिया(60), मनीष त्रिपाठी(26), राजेश पांडे(52) व राहुल दुबे(34) या आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पैशांसाठी आरोपींनी हा सर्व प्रकार केल्याचे आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. आरोपींच्या पैशांची देवाण-घेवाण याबाबत पोलिस तपास करत आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार पाच लाखांचे व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

corona vaccine
तब्बल सोळा वर्षांनी नरवीर चिमाजी अप्पा स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा

यातील शिवराज पटारिया कांदिवलीतील शिवम रुग्णालयाशी संबंधीत आहेत. त्यांनी आरोपींना लसी पुरवल्याचे प्राथमिक तपासता निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महापालिकेला लिहिलेच्या पत्रानुसार शिवम रुग्णालयावरही पालिकेने कारवाई केली आहे. यातील महेंद्र सिंग, संजय गुप्ता, करीम अली, शिवराज पटारिया व निता पटारीया तसेच मनीष त्रिपाठी यांचा नऊ गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. यातील त्रिपाठीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण दिंडोशी सत्र न्यायालयाने तो फेटाळल्यामुळे अखेर त्रिपाठी यांने कांदिवली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. गुन्ह्यांत वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत, तसेच त्यांची खाती गोठवण्यात आली.

मुंबई व परिसरात 12 ठिकाणी झालेल्या बोगस लसिकरणाप्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतही आरोपींनी बोगस लसीकरण आयोजीत केले होते. याप्रकरणी 11 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींनी हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलासह बोरिवलीमधील आदित्य महाविद्यालयात 225, मानसी शेअर्स अँड स्टॉक बोरिवली पश्चिममध्ये 514, पोदार एज्युकेशन सेंटर परळ मध्ये 207 , टिप्स कंपनी अंधेरीमध्ये 151, टिप्स कंपनी खारमध्ये 206, बँक ऑफ बडोदा लिंक रोड ब्रँच मालाडमध्ये 40, नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसी येथे 354, ठाणे येथे 116, जणांचे लसीकरण केले आहे. याशिवाय आरोपींनी अंधेरी व ठाण्यातील नौपाडा या ठिकाणीही बोगस लसीकरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपींनी 2600 जणांचे लसीकरण केले असून त्याती सुमारे 700 लसी बोगस होत्या. त्यात मिनिरल वॉटर, सलाईन वॉटरचा वापर करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.