Uddhav Thackeray Aurangabad Visit :उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर कपिल पाटील यांची टीका

सरकार चालवताना त्यांना असं वाटत होत की मी घरुन चालवू शकतो; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Kapil Patil criticize Uddhav Thackeray Aurangabad visit mumbai politics
Kapil Patil criticize Uddhav Thackeray Aurangabad visit mumbai politics sakal
Updated on

डोंबिवली - दोन वर्षानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ठाकर यांच्यावर निशाणा साधत चला दोन वर्षांनंतर तरी यांना शेतकऱ्यांसाठी तरी बाहेर पडले आहेत. सरकार चालवताना त्यांना असं वाटत होतं की मी घरून चालवू शकतो पण शेतकऱ्यांच्या भावना घरून समजून घेता येत नसतील म्हणून आता ते औरंगाबादला चालले आहेत असा टोला ठाकरे यांना लगावला. कल्याण पश्चिम येथे खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रम सोमवारी सकाळी होणार आहे. टीवची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री पाटील हे कल्याण मध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दोऱ्यावर निघाले आहेत. याविषयी मंत्री पाटील यांना विचारले असता, त्यांना धन्यवाद करायला पाहिजे.

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी तरी बाहेर पडले. आता दिवाळीचा गोडवा आहे कशाला त्यांच्यामध्ये आपण कडूपणा आणायचा आणि काहीतरी आपण त्यांच्यावर भाष्य करायचं असे बोलून पहिले सांभाळून घेत, नंतर हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे सरकार चालवताना त्यांना असं वाटल होत की मी घरून चालवू शकतो पण शेतकऱ्यांच्या भावना घरात बसून समजल्या नसतील. त्या निमित्ताने तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा काम करतात असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. सरकारच्या वतीने दिले जाणारे आनंदाची शिधा हे किट शहापूर येथे 100 रुपयांचे किट 300 रुपयाला विकले गेले आहे यावर पाटील म्हणाले, शहापूरच्या ढाकळी गावामध्ये अशा प्रकारची घटना घडली असून ती सत्य आहे. मी डीएसओ ला तात्काळ सूचना दिल्या होत्या डीएसओ ने त्याची चौकशी केली व त्यावर एफआयआर दाखल केली आहे.

आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या रेशन दुकानदाराने 100 च्या ऐवजी 300 रुपये घेतले परंतु त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. त्यांना हेरिंग देऊन किंबहुना त्याच्या दुकानाचा परवाना देखील रद्द होईल. अशा प्रकारची कारवाई त्याच्यावर निश्चितपणाने होईल मी आपल्या माध्यमातून आवाहन करीन की अजून याचं वाटप सुरू आहे रेशन दुकानदारांनी गरीब लोकांच्या भावनांशी खेळ करू नये. ज्या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय केलाय आणि आनंदाचा शिधा अशा प्रकारची भावना ठेवून लोकांपर्यंत शंभर रुपयांमध्ये ज्या चार वस्तू पोहोचवण्याची संकल्पना केलेली आहे त्याला खऱ्या अर्थाने रेशन दुकानदारांनी सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कुठेही अशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेऊन लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम कराव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.