मुंबई - शहरातील वांद्रे परिसरातील कराची बेकरीच्या नावाला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. स्थानिक मनसे नेत्यानेही बेकरीच्या मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीशीला बेकरीच्या मालकाने उत्तर दिले आहे.
बेकरीची स्थापना पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात आलेल्या एका सिंधी-हिंदू परिवाराने केली होती. कराची बेकरीचा ब्रॅंड मुंबईसह दुरवर पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखवण्यासाठी तर या नावाचा वापर केला गेला नाही ना. असा आक्षेप लोकांनी घेतला होता. बेकरीचे संस्थापक खानचंद रमानी हे फाळणीदरम्यान पाकिस्तानच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईतील आपल्या विस्तापित ठिकाणी या बेकरीचे नाव कराची ठेवले असे आहे. अशी माहिती बेकरी मालकाने नोटीशीला उत्तर देताना केली आहे.
कराची बेकरी हे नाव भारतीयांच्या भावना दुखवणारं आहे. त्यामुळे बेकरीचं नाव बदलण्यात यावं आणि साईन बोर्डही मराठीत असावं अशी मागणी स्थानिक मनसे नेते हाजी सैफ शेक यांनी केली होती. त्यांनीच बेकरी मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
बेकरीच्या मालकाने दिलेल्या उत्तरात असंही सांगण्यात आलं आहे की, "पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरल्याने त्यांच्याकडून भारतीयांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य करण्यात येणार नाही. बेकरीच्या संस्थापकांनी कराची हे नाव देऊन भारतीय सैन्यांप्रती असन्मान दर्शवला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे बेकरी संस्थापकांच्या भारत निष्ठेवर जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत."
Karachi bakery owners victims of partition violence Responded to MNS notice
-------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.