'त्या' अभिनेत्रींच्या संपर्कातील 110 जणांची चाचणी; 4 इमारती सील

Corona Test
Corona TestSakal media
Updated on

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) या दोन अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आल्या आहेत. या अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या 110 (people came in contact) जणांच्या चाचण्या (corona test) करण्यात आल्या असून त्याचा अहवाल (corona report) बुधवारी येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh kakani) यांनी सांगितले. दरम्यान,  या प्रकरणी आतापर्यंत चार इमारती सील करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Corona Test
मुंबई : आजपासून रात्रपाळीतही विशेष लसीकरण; जाणून घ्या सविस्तर माहिती

अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्री चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीनंतर त्या दोघींची कोरोना चाचणी केली असता त्या दोघी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्री पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल उद्या येईल. दरम्यान पालिकेने या अभिनेत्री राहत असलेल्या इमारतींमध्ये कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्याचाही अहवाल उद्या येणार आहे.

चार इमारती सील

दरम्यान, करण जोहर यांचा कोरोना रिपोर्ट निगटीव्ह आला आहे तरीही सुरक्षेचे कारण म्हणून पालिकेने करण जोहर, करिना कपुर, अमृता अरोरा, सोहेल खान याची पत्नी सीमा खान राहत असलेल्या चार इमारती सील केल्या आहेत. करण जोहर यांनी आयोजित केलेल्या पार्टीला 8 ते 10 जण त्या पार्टीत सहभागी होते अशी माहिती पालिकेला देण्यात आली आहे. मात्र यापेक्षा अधिक जण या पार्टीला असल्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली असल्याने कडक कार्यवाही करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

या 4 इमारती सील

सीमा खान (सोहेल खानची पत्नी) - किरण अपार्टमेंट

करीना कपूर- सद्गुरू शरण

करण जोहर - द रेसिडेन्सी

अमृता अरोरा - सरकार हेरिटेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.