कर्जत : शहरी धकाधकीला कंटाळलेल्या प्रत्येकाला आता निसर्गाच्या सानिध्यात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे... त्यासमोर बगीचा...तरण तलाव असावे, असे वाटू लागले आहे. परंतु जमिनीचे गगनाला भिडलेले भाव त्यांना या विचारापासून दूर घेऊन जातात. पण, मुंबई आणि ठाण्याच्या नजिक असलेल्या कर्जत तालुक्याने अशा निसर्ग आणि शांतताप्रेमींसाठी पर्याय दिला आहे. "स्वस्त आणि मस्त' म्हणून प्रसिद्ध असेलला हा तालुका अनेकांना आकर्षित करत आहे. त्यामुळेच जमिन खरेदी-विक्री व्यवहारातून 2019 पासून सरकारच्या तिजोरीत तब्बल 60 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. लॉकडाऊननंतर खरेदी-विक्रीच्या वाढलेल्या व्यवहारांमुळेही ही बाब अधोरेखीत झाली आहे.
मुंबई-पुण्यातील मुंबईतील जीवन घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे झाले आहे. त्यामुळे आठवडा अखेरीस एक-दोन दिवस विश्रांती करण्याची, कुटुंबियांना वेळ देण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे पर्यटनस्तळांकडे अशा दिवशी गर्दी वाढते. हे हेरून काही व्यवसायिकांनी अशा ठिकाणी बंगल्यांसाठी भूखंड विक्री सुरू केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, पाली आणि कर्जत ही शहरे अग्रभागी आहेत. त्यामध्ये आता कर्जत शहराला अधिक पसंती मिळू लागली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत घालवण्यासाठी सेकंड होम म्हणून या तालुक्याला पसंती मिळत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ लागले आहेत.
2019-20 या आर्थिक वर्षात 41 कोटी 58 लाख 91 हजार; तर 2020-21 जानेवारीपर्यंत 20 कोटी 41 लाख 55 हजार मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. कोरोना काळात कार्यालये बंद असल्याने तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्याने व्यवहाराच्या फारशा नोंदी झालेल्या नाहीत. मात्र आता यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महसूलातही वाढ होईल .
- बी. जी. कणसे,
दुय्यम निबंधक, कर्जत
...म्हणून आकर्षण
विपूल निसर्ग ही कर्जतची ओळख आहे. पर्यटनस्थळांमुळे लौकीक आहे. तसेच कर्जत तालुका हा मुंबई-पुण्याच्या मध्यभागी आहे. रेल्वे, रस्ते मार्गही आहेत. त्यामुळे या तालुक्याला बहुतांश जण "सेकंड होम'साठी पसंती देत आहेत.
......
छोट्या भूंखडांना पसंती
कर्जत तालुक्यातील जमिनीचे भाव काही वर्षांपासून वाढत आहेत. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घेत अनेक विकासकांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिन खरेदी केल्या आहेत. ते छोटे - छोटे भूखंड करून विक्री करतात. त्यामुळे पाच आकडी पगारवाले आणि छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना भूखंड खरेदी करणे शक्य होत आहे.
------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
karjat farm house Best for Second Home Mumbai Punekars Preference resort
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.