माजी आमदार विवेक पाटील यांच्या 234 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

Vivek Patil
Vivek Patilsakal med
Updated on

मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे (karnala bank) माजी अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील (vivek patil) यांच्या 234 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने(enforcement directorate) टाच आणली. त्यात कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी (karnala sports academy) व इतर मालमत्ताचा (other properties) समावेश आहे.

याप्रकरणी ईडीच्या तपासात 63 बोगस खात्यांच्या माध्यमातून गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणल्याचा संशय आहे. ही रक्कम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या कर्ज खात्यावर पैसे जमा झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या दोनही संस्थांवर पाटील यांचे वर्चस्व होते. 2008 पासून हा गैरव्यवहार सुरू असल्याचे ईडीला समजल्यानंतर 15 जूनला पाटील यांना ईडीने अटक केली होती. या रकमेतून अकादमी व संस्थेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महाविद्यालय, शाळा यांची निर्मीती करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण गैर्यव्यवहार 560 कोटी रुपयांचा आहे.

Vivek Patil
मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशात कला शाखेचीच मोठी चुरस

कर्नाळा बँकेत कोट्यावधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे ठेवीदारांनी आंदोनही केले हो आंदोलनही केले होते. या बँकेत 50 हजार 689 ठेवीदार आहेत. याप्रकरणी पनवेलमधील स्थानिक आमदाराने याप्रकरणात ईडीला पुरावे सादर केले होते. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याला आधार बनवून ईडीने याप्रकरणी झालेल्या संशयीत मनी लाँडरींगचा तपास सुरू केला होता. त्या अंतर्गत संशयीत आरोपींनी 512 कोटी 54 लाख रुपये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज घेऊन व्यवहारात आणले, असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी जून महिन्यात पाटील यांना पनवेलमधून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी नुकतीच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.