Mumbai News : रुग्णवाहिकेचा वापर असाही! पालिकेच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी होतोय वापर

इतर वाहनाचा वापर न करता पालिका प्रशासनाने चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला.
kdmc news
kdmc news sakal
Updated on

KDMC News : एकीकडे रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयातून इतर रुग्णालयात हलविताना रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. कधी चालक नाही, तर कधी रुग्णवाहिका उपलब्ध नाही अशी कारणे रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जातात.

तर दुसरीकडे पालिकेच्या विभागीय कार्यालयातील कामकाजाच्या फाईल्स, कपाट आदि साहित्य हलविण्यासाठी चक्क पालिकेच्या रुग्णवाहिकेचा वापर केला जात असल्याची बाब उघड झाली आहे. रुग्णांना हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना दुसरीकडे पालिका प्रशासन अशा पद्धतीने रुग्णवाहिकेचा वापर करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

kdmc news
Mumbai Traffic News : डोंबिवली पश्चिमेत वाहन कोंडी होणार नाही ; 'डि' कंजेक्शन प्लॅन तयार !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे या इमारतीमधील विविध विभागाची कार्यालये ही 90 फिट रोडवरील बालाजी आंगण यांसह पीपी चेंबर, डोंबिवली पश्चिमेतील पालिकेच्या काही जागा आदि भागात हलविण्यात आली आहेत. प्रशासकीय इमारती मधील कामकाजाच्या फाईल्स हलविण्यासाठी टेम्पो किंवा इतर वाहनाचा वापर न करता पालिका प्रशासनाने चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला आहे.

kdmc news
Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

बुधवारी पालिकेच्या विभागीय कार्यालयातून जन्म मृत्यु नोंद विभागातील फाईल्स हलविण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले.

याविषयी पालिका अधिकाऱ्यांनी ही जुनी वापरात नसलेली रुग्णवाहिका असल्याचे सांगितले. मात्र त्याचे रंगकाम करणे तसेच त्यावरील रुग्णवाहिकेचा सायरन्स काढण्याची तसदी देखील पालिका प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसून आले. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

kdmc news
Mumbai: भटक्या श्वानांचा 5 जणांना चावा; कल्याण पश्चिमेत भटक्या श्वानांची दहशत

फाईल्स हलविण्यासाठी वापरण्यात आलेली रुग्णवाहिका ही जुने झालेले वाहन आहे. वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यासाठी ते सध्या वापरले जात आहे. रुग्णालयांत रुग्णवाहिका आहेत. मात्र कधी कधी वाहने नादुरुस्त होतात.

ती दुरुस्त होऊन लवकर आली नाही तर रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाहीत. परंतू रुग्णवाहिका या चांगल्या प्रमाणात पालिकेकडे उपलब्ध आहेत. सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या वाहनाची रंगरंगोटी करुन त्यावरील रुग्णवाहिकेचा लोगो काढला जाणे आवश्यक आहे.

डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.