डोंबिवलीत बेकायदा बांधकाम कारवाईत भाजप पदाधिकाऱ्यांचा व्यत्यय; केडीएमसीचे पथक कारवाई न करताच फिरले माघारी

KDMC: काही काळ तणावपूर्ण वातावरण तेथे निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावास हुसकावून लावले.
Dombivali : भाजप कार्यकर्त्यांपुढे झुकली महापालिका,पथक कारवाई न करताच फिरले माघारी
Dombivali sakal
Updated on
Summary

नांदिवली पंचानंद येथील डॉन बॉस्को शाळेच्या पाठीमागील भागात जयेश म्हात्रे आणि त्यांचे इतर दोन भाऊ यांची वडिलोपार्जित जमिन आहे.

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या सांगाव येथील नांदीवली पंचानंद येथील राधाई या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी दुपारी पालिकेचे ई प्रभागाचे तोडकाम पथक, मानपाडा पोलीस घटनास्थळी कारवाईसाठी दाखल झाले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते याठिकाणी मोठ्या संख्येने जमा होऊन त्यांनी कारवाईत व्यत्यय आणला. यामुळे केडीएमसीच्या पथकाला कारवाई न करताच हात हलवत माघारी फिरावे लागले.

Dombivali : भाजप कार्यकर्त्यांपुढे झुकली महापालिका,पथक कारवाई न करताच फिरले माघारी
Dombivali Fire : डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा!

नांदिवली पंचानंद येथील डॉन बॉस्को शाळेच्या पाठीमागील भागात जयेश म्हात्रे आणि त्यांचे इतर दोन भाऊ यांची वडिलोपार्जित जमिन आहे. या जमिनीवर भूमाफियांनी सात मजली राधाई नावाची बेकायदा इमारत उभारली आहे. जमीन मालक जयेश यांनी या बेकायदा इमारती विरुध्द पालिका आयुक्तांसह, ई प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल पालिका अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

Dombivali : भाजप कार्यकर्त्यांपुढे झुकली महापालिका,पथक कारवाई न करताच फिरले माघारी
Dombivali Blast: डोंबिवली MIDC मधील त्या कंपन्या स्थलांतरीत होणार की नाही? प्रश्न चिघळला

अखेर जयेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी ॲड. सुहास देवकर यांच्या पुढाकाराने दोन वर्षापूर्वी एक याचिका कल्याण डोंबिवली पालिका प्रशासना विरुध्द दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्या. एम.एस. सोनक, न्यायमूर्ती कमल खट्टा यांनी नांदिवली पंचानंद येथील राधाई बेकायदा इमारत जमीनदोस्त करून या कारवाईचा अहवाल 19 जुलै रोजी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Dombivali : भाजप कार्यकर्त्यांपुढे झुकली महापालिका,पथक कारवाई न करताच फिरले माघारी
Dombivali Crime : वेश्या व्यवसायातून सुटका व्हावी म्हणून अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

राधाई या बेकायदा इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाची बांधकाम परवानगी नाही. महारेराचा बनावट नोंदणी क्रमांक या इमारतीसाठी मिळविण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतीमधील सदनिका भूमाफियांनी नियमबाह्य दस्त नोंदणीकरण करून विक्री केल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते जयेश म्हात्रे यांनी दिली.

राधाई इमारतीवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पालिकेकडून कारवाई होणार असल्याने भूमाफियांनी गेल्या काही दिवसात 15 बनावट रहिवासी या इमारतीत घुसवून या इमारतीत रहिवास आहे असे दाखविण्याचा देखावा पालिकेसमोर उभा केला असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. पालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी ही इमारत तोडण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त जगताप यांना दिले आहेत, असे याचिकाकर्त्याला सांगितले. ही इमारत तोडली जाईल, असे म्हात्रेंना पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

मंगळवारी या कारवाईसाठी पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी भाजप ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते संदिप माळी, नंदू परब, बबलू तिवारी, मनिषा राणे व इतर कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात या कारवाईत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण तेथे निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी जमावास हुसकावून लावले. या विरोधामुळे पालिकेचे पथक कारवाई न करताच हात हलवत माघारी फिरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com