कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) सर्वच रस्त्यांची चाळण झाली (road potholes) असून नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून आपला जीव वाचवीत येजा करावी लागत आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन (kalyan rambaug lane) चार मधील स्वानंद कॉलनी परिसरातील खड्डेमी रस्त्यांची वारंवार तक्रार व पत्रव्यवहार (letters) करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष (ignores) करीत असल्याने या परिसरातील नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन (strike in potholes) केले. अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर बॅनर व पत्रकावर प्रसिद्धी करीत नागरिकांना अधिकाऱ्याना निवेदन पाठविण्याचे आवाहन करीत फोन व मोबाइल करो आंदोलन केले.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वच भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डेमय रसत्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात घडण्याच्या अनेक घटना घडल्या असताना मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्ती साठी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे खड्डेमे रस्त्यांमध्ये दगडी खडि टाकून थातुर मातुर कामे केल्याचा आव आणून कोट्यावधी रुपयांची रस्त्याच्या दुरुस्ती साठी उधळण केली जात असल्याने करदात्या नागरिकांच्या डोळ्यात डुलफेक करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याने नागरिकांमध्ये संतांपाचे वाटवर्ण पसरले आहे .
कल्याण पश्चिमेकडील रामबाग चार नंबर विभागातील प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील सामाईक रस्ता असलेल्या कनकावती बिल्डिंग ते साई विठ्ठल टॉवर या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तिरंगा जागृती विचार मंच या सामाजिक संघटनेने पालिका प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार व तक्रारि करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत रस्त्यांचे डांबरीकरण करीत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरंगा जागृती विचार मंचचे अध्यक्ष चेतन म्हामुणकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा देवकुले ,योगेश हंकारे ,अजय सिंग,दिनेश पिंपळे ,अविनाश पाटील,बेबीताई ,जनाबाई पानखडे,हेलन पिल्ले आदि या परिसरातील नागरिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले.
अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर बेनर व पत्रकावर प्रसिद्धी करीत नागरिकांना अधिकाऱ्याना निवेदन पाठविण्याचे आवाहन करीत फोन व मोबाइल करो आंदोलन केले.पालिका प्रशासनाला येत्या १५ दिवसांत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम न झाल्यास नागरिकांच्या वतीने पालिकेवर मोर्चा आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.