केदार दिघेंचा महिला धमकी प्रकरणी जबाब नोंदवला

शिवसेनेचे ठाणे जिल्हा शाखा प्रमुख केदार दिघे यांचा एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला.
 Kedar Dighe
Kedar Dighesakal
Updated on
Summary

शिवसेनेचे ठाणे जिल्हा शाखा प्रमुख केदार दिघे यांचा एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला.

मुंबई - शिवसेनेचे ठाणे जिल्हा शाखा प्रमुख केदार दिघे यांचा एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार आणि गुन्हेगारी धमकी प्रकरणी जबाब नोंदवण्यात आला. केदार दिघे यांनी कोणालाही धमकी दिल्याचे नाकारले असल्याची माहिती आहे. केदार दिघे सोमवारी सकाळी आपल्या वकिलासह पोलीस ठाण्यात आले. आपल्या निवेदनात त्यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचे नाकारले. दिल्लीतील व्यावसायिक रोहित कपूरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता.

केदार दिघे यानी महिलेला तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची वाच्यता न करण्याची धमकी दिली. आरोपी रोहित कपूर यांच्या विरोधात मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात भा. द. वि. 376, 506 (2) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी त्याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी केली होती. गुन्हेगारी धमकीच्या आरोपात केदार दिघे यांचेही नाव गुन्ह्यात नोंदवले असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.