केईएम रुग्णालयात 500 बालकांना बसवले कॉक्लिअर इम्प्लांट; कर्णबधिरांना दिलासा

केईएम रुग्णालयात 500 बालकांना बसवले कॉक्लिअर इम्प्लांट; कर्णबधिरांना दिलासा
Updated on

मुंबई : मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या (KEM hospital) शीरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. जन्मत:च कर्णबधीर असलेल्या मुलांसाठी (deaf children) अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीची असणा-या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रीयेचं (Cochlear Implant Surgery) 5 वे शतक केईएम रुग्णालयानं नुकतंच पूर्ण केले आहे. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे आधुनिक उपकरणाच्या (machines) सहाय्याने काहीही ऐकु न येणा-या मुलांमध्येही श्रवणक्षमता तयार होत असून ही मुले आता ऐकू आणि बोलू लागली आहेत.

केईएम रुग्णालयात 500 बालकांना बसवले कॉक्लिअर इम्प्लांट; कर्णबधिरांना दिलासा
मुंबई : गणेश विसर्जनासाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या...

2 वर्षाचा लहानगा कुणाल आणि ईशा. या दोघांनाही जन्मत:च ऐकु येण्याची समस्या आहे. जन्मत:च श्रवणदोष होता. मात्र, या दोन्ही लहानग्यांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रीया वरदान ठरली. या शस्त्रक्रीयेद्वारे बसवलं जाणारं अत्याधुनिक यंत्र अत्यंत महागडं आहे. सुमारे 6 लाख ते 15 लाखांपर्यंत याची किंमत आहे. परदेशातूनच हे यंत्र आयात करावं लागत असल्यानं याची किंमत वाढते. त्यामुळे अनेक स्ववंसेवी संघटनांच्या आर्थिक सहाय्याने केईएम रुग्णालयाने 500 शस्त्रक्रीयांचा टप्पा ओलांडला आहे.

जन्मजात कर्णबधिर किंवा काही काळापर्यंत ऐकू आल्यानंतर बहिरेपणं येणे अशा समस्यांवर कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला ऐकू येऊ लागते. पण, ही शस्त्रक्रिया एका विशिष्ट वयात केली तर त्याचा फायदा होऊन त्या व्यक्तीचे आयुष्य सुखकर बनण्यास मदत होते. या मुलांच्या आयुष्यात हाच आनंद पालिकेच्या केईएम रुग्णालयाने भरला आहे. कारण, मुंबईतील केईएम रुग्णालयात 500 लहान मुलांना कॉक्लिअर इम्प्लांट बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे, कर्णबधिर लहानग्यांना रुग्णालयाने आवाजाचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे पालिकेचे केईएम रुग्णालय हे मुंबईतील पहिले शासकीय रुग्णालय आहे असा दावा रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

 एका व्यक्तीला कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास 6 ते 15 लाखांपर्यंत खर्च येतो. पण, या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाने मोफत केल्या असून वेगवेगळ्या धर्मादाय संस्था आणि एनजीओच्या मदतीने शिवाय, क्राऊंड फंडीग करुन हे शक्य झाल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात 500 बालकांना बसवले कॉक्लिअर इम्प्लांट; कर्णबधिरांना दिलासा
अंधेरी-घाटकोपर रस्त्यासाठी सल्लागार; भौगोलिक सर्वेक्षणानंतर उपाययोजना

2 वर्षांपर्यंत केलेली शस्त्रक्रिया लाभदायक

कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया परदेशात आणि केरळात ही 2 वर्षांखाली केली जाते. पण, भारतात ही शस्त्रक्रिया पाच वर्षांपर्यंत केली जाते. पण, हा कालावधी कमी करण्यासाठी पालिकेचे कान-नाक-घसा विभागाचे सर्जन्स प्रयत्न करत आहेत. केईएममध्ये संपूर्ण भारतातील रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. ओपीडीत येणाऱ्या 10 रुग्णांपैकी फक्त एकाचीच शस्त्रक्रिया केली जाते. कारण, या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना फार धावपळ करावी लागते. कारण, बऱ्याच एनजीओंना कागदपत्रांचा व्यवहार करावा लागतो. त्यातून निधी गोळा करावा लागतो

10 टक्के प्रौढ

केईएम रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियांपैकी 10 टक्केच लोक प्रौढ आहेत. ज्यात 9 ते 82 वर्षापर्यंतच्या सर्व नागरिकांचा समावेश आहे. यात एका काळापर्यंत ऐकू येत होते, बोलता येत होते पण, काही काळानंतर अचानक ऐकू येणे बंद झाले अशा नागरिकांचा समावेश असतो. हेच प्रमाण परदेशात 78 टक्के आणि 22 टक्के पिडीयाट्रिकचे प्रमाण आहे. ज्या लोकांना ऐकू न आल्यामुळे बोलता येत नाही असे नागरिक किंवा लहान मुले डिप्रेशनमध्ये जातात. असे नागरिक दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे, अशा नागरकांनी उपचारांसाठी पुढाकार घ्यावा , असे केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात 500 बालकांना बसवले कॉक्लिअर इम्प्लांट; कर्णबधिरांना दिलासा
खालापूर महावितरण विभागाची पावसाने घेतली परिक्षा

मुंबईतील पहिले रुग्णालय

कॉक्लिअर इम्प्लांटच्या पाचशे शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केईएम रुग्णालयाने हा आनंद साजरा करत काही दिवसांपूर्वी केक सुद्धा कापला. या शस्त्रक्रियेसाठी केईएम रुग्णालयाला वेगवेगळ्या ठिकाणांहून निधी मिळतो. टाटा, सिद्धिविनायक, लालबाग अशा काही संस्थांकडून निधी पुरवला जातो. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यावधींच्या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाकडून झालेल्या आहेत. मुंबईतील केईएम हे पहिले रुग्णालय ठरले आहे असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

काय असते  कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ? 

सामान्यपणे मातेच्या गर्भातच बाळाला ऐकू येते. पण, बाळाला जर दोन ते अडीच वर्षांपर्यंत ऐकू येत नसेल तर कानाच्या आत आणि बाहेर शस्त्रक्रिया करुन कॉक्लिअर इम्प्लांट बसवले जाते. तीन आठवड्यानंतर त्या मशीनचे स्विच ऑन केले जाते. त्यानंतर बाळाला ऐकून बोलण्याची थेरेपी घ्यावी लागते. या यशस्वी प्रक्रियेनंतर बाळ किंवा प्रौढ व्यक्ती बोलू आणि ऐकू शकते. त्यामुळे, जर बाळ बोलत नसेल, हाक मारला तर बघत नसेल तर आई-वडिलांनी बाळाची समस्या ओळखून तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे असे ही डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले. अवतीभवतीचा प्रत्येक आवाज टीपणारा कान अनेकांकडे नाहीय...मात्र, या कानांनी जगातला प्रत्येक श्रवणीय सूर टिपावा याकरता मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे डॉक्टर्स अहोरात्र झटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.