मुंबई: केईएम हॉस्पिटलमध्ये 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कुटुंबियांनी हॉस्पिटलला दोषी ठरवलं आहे. डॉक्टर आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत व्यक्तिच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, त्याचा श्वासोच्छवास सुरू असतानाही त्याला आधी हॉस्पिटलमध्ये घेण्यास उशीर केला. तसंच डॉक्टरांना सांगूनही ही, डॉक्टरांनी त्याला अँटीबायोटिक्स दिले. ज्याची त्याला अॅलर्जी होती. औषध दिल्यानंतर पुढच्या दोन तासात त्याचा जीव गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलं आहे.
माटुंगा येथील इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) कडून डॉक्टरेट मिळवणारे डॉ. वैभव साबळे हे आपली आई, बहीण आणि मावशीसह राहत होते. ते मूळचे मानूर वाडी येथील रहिवासी आहेत. 14 मे रोजी वैभव याला ताप आल्यानं जवळच्या डॉक्टरांकडे गेला. त्या डॉक्टरांनी त्याला काही औषधे दिली. त्या औषधांनी बरे वाटलं नाही तो दुसऱ्या डॉक्टरकडे गेला. तिथून आल्यानंतर तो अजून अस्वस्थ झाला. नंतर, तो भरपूर पाणी प्यायला आणि त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, असं वैभवची आई कल्पना यांनी सांगितलं.
संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वैभव यांना कुटुंबीयांनी केईएम हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. एक्स रे मध्ये त्याच्या फुफ्फुसात पाण्याचे ठिपके (patches) दिसले. वैभव आणि त्याच्या कुटुंबीयांना डॉक्टरांनी थोडावेळ थांबायला सांगितले. सकाळी 12.30 च्या सुमारास त्याला अॅडमिट करण्यात आले आणि कोविड-19च्या चाचणीसाठी त्याची स्वॅब घेण्यात आली. आम्ही त्याला वडाळ्याच्या खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला, पण केईएमच्या डॉक्टरांनी सांगितले की त्याला कोविड-19 चा कॉन्ट्रॅक्ट झाला आहे ज्यामुळे त्याला डिस्चार्ज देऊ शकत नाही, असं वैभवचे काका संघपाल सोनवणे म्हणाले.
आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला वैद्यकीय सल्ल्याविरूद्ध डिस्चार्ज हवा आहे (DAMA),मात्र त्यांनी नकार दिला आणि खासगी रुग्णालयात कॉलही केला आणि सांगितलं की, आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ शकत नाही, असं वैभवच्या काकांनी पुढे सांगितले.
वैभव 14 मे रोजी रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये झोपला होता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दुसर्या दिवशी त्यांनी वैभवला अँटीबायोटिक्स देण्याचे ठरविले, असं त्याच्या आईनं सांगितलं. आम्ही डॉक्टरांना सांगितले की त्याला अँटीबायोटिक्सची अॅलर्जी आहे. मात्र असं सांगितल्यावर डॉक्टर माझ्यावर ओरडले आणि म्हणाले, औषधांच्याबाबतीत मला शिकवू नका. अँटीबायोटिक्स दिल्यानंतर त्याच्या शरीरावर लाल पॅचेस दिसायला सुरुवात झाली आणि दोन तासात त्याचा मृत्यू झाला, असं वैभवच्या कुटुंबियांनी सांगितलं.
वैभवचं कुटुंब 16 मे रोजी मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी परत हॉस्पिटलमध्ये आले. मात्र कोविड-19चा अहवाल न आल्यानं त्यांना वाट पाहण्यास सांगितलं. 18 मे पर्यंत त्यांना असाच प्रतिसाद मिळत राहिला. त्यानंतर कुटुंबियांनी हॉस्पिटलनं नमुना पाठविल्याचा दावा करत असलेल्या प्रयोगशाळेत जाण्याचे ठरविले. प्रयोगशाळेत गेल्यावर धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, वैभवचे नमुने न मिळाल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं.
त्यानंतर आम्ही केईएमच्या डीनच्या कार्यालयात धाव घेतली. तिथे गेल्यावर अधिकारी म्हणाले की एकतर शरीरावर कोविड-19 संशयित असं लिहिलं असेल किंवा प्रशासनानं शरीरावर दावा न केलेला (unclaimed) असं लिहिलं असेल, असं सोनावणे यांनी सांगितलं.
वैभवच्या कुटुंबियांनी 20 मे रोजी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार केले. अनेक पाठपुरावा करूनही हॉस्पिटलनं त्यांना काही तपशील न दिल्यानंतर वैभवच्या कुटुंबियांनी 20 जूनला वडाळा पोलिस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितले की, या तक्रारीनंतर तपास करण्यास सुरुवात केली आहे. केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांना कॉल आणि मेसेजेस केले असून त्यांनी अद्याप काही उत्तर दिलं नाही आहे.
KEM hospital killed my son relatives blames hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.