केईएम रुग्णालयातील ब्रेन स्ट्रोक युनिट झाले सक्षम

चोवीस तास उपचार, सुवर्णकाळ कमी झाल्याचा फायदा
kem hospital
kem hospitalsakal media
Updated on

मुंबई : मुंबईच्या परळ येथील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) पक्षाघात, प्यारालेसीस (Paralysis) , लकवा रुग्ण यांच्यासाठी 2018 साली सुरु केलेले ब्रेन स्ट्रोक युनिट (brain stroke unit) आता आणखी सक्षम झाले आहे. या युनिटमध्ये चोवीस तास उपचार (24 hours' treatment) केले जात आहेत. दरम्यान, पक्षाघाताच्या रुग्णांचा सुवर्णकाळही गाठण्यात डॉक्टरांना यश (Doctors successful) आले असून रुग्ण अजूनही लक्षण दिसल्यानंतर किंवा नातेवाईकांना जाणवल्यानंतर रुग्णालयात पोहोचत नसल्याची खंत केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

kem hospital
मुंबई : रिलायन्सचे पहिले बहुद्देशीय मोबिलिटी स्टेशन नावडे येथे सुरू

मोठ्या स्वरुपाचा प्यारालेसीस म्हणजेच मोठी रक्तवाहिनी बंद होणे, प्यारालेसीसचा अटॅक आल्यानंतर पहिले लक्षण दिसल्याच्या 24 तासांच्या आधी रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले तर त्या रुग्णाचा जीव वाचवणे अधिक सोपे होते. केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने 'डोर टू नीडल' या अंतर्गत दोन ड्राय रन केले. वेळ कसा कमी करता येईल यावर विशेष लक्ष देण्यात आले. पक्षाघात किंवा मेंदूचा झटका आलेला रुग्ण दारात आल्यानंतर पहिले इंजेक्शन किती वेळात मिळते यावर हे दोन ड्राय रन घेतले गेले.

हा रुग्ण आल्यानंतर किमान एका तासात इंजेक्शन देऊन त्याच्यावर उपचार सुरु झाले पाहिजे ही पद्धत जगात सगळीकडे वापरली जाते. पण, यासाठी आधी केईएम रुग्णालयात जास्तीत जास्त 4 ते साडे चार तास लागायचे. पण, आता हा वेळ कमी झाला असून किमान दिड ते दोन तासांपर्यंत आणून त्या रुग्णावर तात्काळ उपचार केले जातात.

जनजागृती महत्त्वाची

एखाद्या व्यक्तीला मेंदूचा झटका आलाच तर किमान साडेचार तासात ती व्यक्ती जर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली तर त्या व्यक्तीवर उपचार करणे सोपे होते. पण, या वेळेत रुग्ण अजूनही पोहोचत नाहीत ही खंत असल्याचे केईएम रुग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.

24 तासांनंतरच रुग्ण येतात

पक्षाघाताचा झटका आल्यानंतर रुग्णावर दोन प्रकारे उपचार केले जातात. पहिल्या तंत्राद्वारे, रुग्णाला इंजेक्शन दिले जाते, ज्याला थ्रोम्बोलिसिस असे म्हणतात, तर दुसऱ्या तंत्रात, अँजिओग्राफी (थ्रॉम्बेक्टॉमी) द्वारे रक्तवाहिन्यांमधील गुठळी काढून अडथळा दूर केला जातो. पण, या सर्व उपचारांसाठी रुग्ण दाखल होण्याचा सर्वाधिक वेळ 24 तासांनंतरचा आहे. पहिल्या साडे चार तासांत रुग्ण दाखल होणे गरजेचेच आहे.

kem hospital
मुंबई : आता फक्त लसवंतांचाच होणार लोकल प्रवास

सतर्कता महत्त्वाची

पक्षाघाताची लक्षणे दिसली किंवा जाणवली की स्वत: रुग्ण ते सांगू शकणार नाही. पण, नातेवाईकांनी ती लक्षणे ओळखून तात्काळ जिथे मल्टीस्पेशालिटी उपचारपद्धती आहे तिथे त्याला घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे. जर केईएम रुग्णालयात वेळेत रुग्ण दाखल झाला तर तात्काळ एमआरआय, सीटीस्कॅन, गरज पडल्यास अँजिओग्राफी, तसंच कॅथलॅबची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. ही सुविधा चोवीस तास सुरु ठेवली आहे. या सर्वात वेळ खूप महत्त्वाचे असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

पक्षाघाताची लक्षणे

बोलता येत नाही.

हात लुळा पडतो.

बोलण्यात अडथळे येतात

पायात चप्पल निसटते

चेहरा, हात , तोंडावर सर्वाधिक परिणाम होतो

चेहरा एका दिशेला जातो

सुवर्णकाळ महत्वाचा

पक्षाघात आल्यानंतर त्या व्यक्तीसाठी सुवर्णकाळ खूप महत्वपूर्ण असतो. त्यामुळे गैरसमज न ठेवता रुग्णाच्या नातेवाईकांनी वेळीच लक्षण ओळखून रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या साडेचार तासांच्या सुवर्णकाळात जर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तर तो चालत पुन्हा घरी परतू शकतो. याचा उपचार खर्च बाहेर 7 ते 8 लाख रुपये लागतो. पण, केईएम रुग्णालयात याचा खर्च किमान एक ते दोन लाख रुपये एवढा येतो. शिवाय, राजीव गांधी योजनेअंतर्गत ही हे उपचार केले जातात असेही डाॅ. डांगे यांनी साांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.