ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटक स्थळांपैकी एक असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनारा. या ठिकाणा काल दुपाऱी अचानक आग लागली. यावेळी नागरीकांची तरांबळ उडाली.
हॉटेल व धब्यांना काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर तारंबळ उडल्याने त्यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली.
विशेष म्हणजे या ठिकाणची असा प्रकार घडला ही माहिती अग्निशामक दलाला मिळाली नव्हती. यामुळे दलाच्या गाड्या या ठिकाणी येवू शकल्या नाही. पर्य़ायी परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोरदार वारा वाहत होता. यामुळे आगी वरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. अखेर काही स्थानिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटन ठिकाणावर हॉटेल चालक, ढाबे चालक अन्रिशामक उपकरण बाळगत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.