'त्या' आक्षेपार्ह ट्विट प्रकरणात कंगणा राणावतला हायकोर्टाचा दिलासा

Kangana Ranaut
Kangana RanautGoogle
Updated on

मुंबई : खलिस्तान संबंधित आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे (Offensive tweet case) अडचणीत आलेल्या अभिनेत्री कंगना राणावतला (Knagana ranaut) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज दिलासा दिला. कंगनाविरोधात कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने न्यायालयात देण्यात आली. तर कंगना पोलीस तपासात सहकार्य करण्याची हमी कंगनाच्या वतीने देण्यात आली.

Kangana Ranaut
डोंबिवली : कोविड काळात पळालेला कैदी सात महिन्यांनी अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने काही ट्विट केले होते. याबाबत मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये खार पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात भादंवि 295 अ अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याची फौजदारी फिर्याद नोंदविण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर कंगनाने खलिस्तान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल पोस्ट केली आहे.

तिने सरसकट सर्व शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले असून सन 1984 च्या दंगलीच्या आठवणीने शीख समुदायाची मने दुखावली आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई आणि दिल्लीतील विविध गुरुद्वारांच्या समित्यांचे सदस्य असलेले अॅड. अमरजितसिंग कुलवंतसिंग संधू, मनजिंदर सिंग सिरसा आणि जसपाल सिंग सिद्धू यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार जाणीवपूर्वक केली असून माझ्या पोस्टमुळे कोणताही गुन्हा निर्माण होत नाही, मी बंदी घातलेल्या संघटनेवर मत व्यक्त केले आहे आणि मला तसा मूलभूत अधिकार आहे, असा दावा कंगनाने याचिकेत केला आहे. ही पोस्ट इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिली होती. याचिकेवर आज न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यामध्ये तूर्तास कंगनाला अटक करण्याचा विचार नाही. पण ती तपासात सहकार्य करत नाही, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यावर, कंगना तपासात सहकार्य करेल आणि ता 22 रोजी खार पोलीस ठाण्यात जाईल, अशी हमी यावेळी देण्यात आली.

कंगनाने ही पोस्ट जाणीवपूर्वक केली होती याचे काही पुरावे आहेत का, असा प्रश्न खंडपीठाने पोलिसांना केला आहे. याचिकेची पुढील सुनावणी ता 25 जानेवारी रोजी होणार आहे. मुंबईसह देशभरात या पोस्टबाबत अनेक ठिकाणी भादंवि कलम 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे असा दावा कंगनाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.