Khardi Hospital : उपजिल्हा रुग्णालयात लॅब कर्मचाऱ्यांची कमतरता; गंभीर रुग्णांची वाढली अडचण...

Khardi Sub-District hospital : शासकीय रुग्णालयातील रुग्ण रक्त तपासणीसाठी खाजगी लॅब चालकांकडे जात आहेत पण तिथेही अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याने रुग्णांची लूटमार होत आहे.
khardi rural hospital
khardi rural hospitalsakal
Updated on

खर्डी : ग्रामीण रुग्णालयाला नुकताच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार असल्याची मंजुरी शासनाने दिली आहे. पण सोईसुविधा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्याच तुटवडा निर्माण झाला असून काही कर्मचारी हे बाहेरील रुग्णालयात कामासाठी जात असल्याने तेथील रुग्णांचे हाल होत आहे.

गेल्या चार महिन्यापासून लॅब असिस्टंट इतर ठिकाणी तर लॅब टेक्निशीयन दहा दिवसांपूर्वी आजारी असल्याने रजेवर गेले आहेत. या रुग्णालयात गेल्या दहा दिवसापासून रक्त तपासणीसाठी एकही अधिकृत कर्मचारी उपलब्ध नव्हते. तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्ण रक्त तपासणीसाठी खाजगी लॅब चालकांकडे जात आहेत पण तिथेही अव्वाच्या सव्वा पैसे घेत असल्याने रुग्णांची लूटमार होत आहे.

खाजगी लॅब धारकांनी केलेल्या रक्त तपासणीच्या रिपोर्टमध्ये विश्वासहर्ता व पारदर्शकता नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. रुग्णालयात लॅब कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

खर्डी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे लॅब असिस्टंट प्रकाश पाटील यांना गोवेली येथील रुग्णालयात उसनवारी तत्वावर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे ती जागा रिक्त आहे. त्यांच्यासोबत काम करीत असलेले लॅब टेक्निशीयन फिरोझ पल्लावकर हे त्यांच्या जागी काम पाहत होते. परंतु आजारी पडल्याने ते देखील दहा दिवसांपासून रजेवर गेले आहेत. त्यामुळे खर्डी रुग्णालयात रक्त तपासणी करण्यासाठी अधिकृत कर्मचारीच उपलब्ध नसल्याने गेल्या दहा दिवसापासून खर्डी ग्रामीण रुग्णालयात खेड्यापाड्यातून येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासणी करण्यासाठी खाजगी लॅब धारकाकडे जावे लागत आहे.

khardi rural hospital
Kalyan: चार वर्षांपासून फरार असलेल्या अमली पदार्थ तस्कराला पोलीसांनी केली अटक, वाचा कसा रचला सापळा

येथील अतिगंभीर रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने इतरत्र हलवलेले तज्ञ तसेच कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून रुग्णांची हेळसांड थांबवाण्याची गरज आहे. खर्डी ग्रामीण रुग्णालयात 90 गावे व 80 पाड्यातून आदिवासी गोरगरीब रुग्ण येत असतात तसेच मोखाडा,वाडा, वाशाळा, मुंबई-आग्रा महामार्ग व कल्याण-कसारा मध्य रेल्वेच्या मार्गावरीलअपघातग्रस्तांचेही इथेच उपचार केले जात असतात.

खर्डी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा दिला पण इतकी भव्यदिव्य इमारत व अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असूनही तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने खेड्यापाड्यातून मोफत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

'सद्या इतरत्र कार्यरत असलेले लॅब असिस्टंट यांना तात्काळ खर्डी ग्रामीण रुग्णालयात हजर करून रुग्णांची हेळसांड थांबवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.'

- गणेश राऊत, तालुका विस्तारक, शिवसेना ठाकरे गट.

'यासंदर्भात पत्रव्यवहार करून वरिष्ठांना कळविण्यात आले असून लवकरच ही अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

- डॉ.आशिलाक शिंदे, वैद्यकीय अधिक्षक, खर्डी ग्रामीण रुग्णालय.

khardi rural hospital
Ulhasnagar: उल्हासनगर महानगरपालिकेचीच इमारतच झाली धोकादायक, 48 वर्षांची झाली इमारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.