Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Baba siddique Murder Case Latest Update : शिवकुमार गौतम याने शनिवारी (ता.१३) रात्री सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या.
NCP Leader Baba Siddique Shot Dead
NCP Leader Baba Siddique Shot Dead
Updated on

मुंबई, ता. १५ : माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्याला लग्न, वरातीत हवेत गोळीबार करण्याव्यतिरिक्त गोळ्या झाडण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तसेच, हत्येआधी त्याने सरावही केला नसल्याचा धक्कादायक खुलासा गुन्हे शाखेच्या तपासातून झाला आहे.

शिवकुमार गौतम याने शनिवारी (ता.१३) रात्री सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. गौतमला गावी लग्नात, वरातीत किंवा अन्य मिरवणुकांमध्ये हवेत गोळ्या झाडण्याचा अनुभव होता. त्याच अनुभवावर त्याने सिद्दीकी यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, असा दावा गुन्हे शाखेने मंगळवारी केला. सिद्दीकी यांच्या हत्येआधी शिवकुमार, धर्मराज काश्यप, गुरमेल सिंगने गोळीबार करण्याचा सराव केल्याची माहिती पुढे आलेली नाही;. मात्र कुर्ला येथील भाड्याच्या खोलीत तिघांनी फक्त बंदूक चालवण्याचा अर्थात चाप ओढण्याचा सराव केल्याची माहिती उघड झाली आहे.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

संवादासाठी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट

सिद्दीकी यांचे घर, कार्यालय येथे आरोपींनी २५ दिवस पाळत ठेवली होती. तसेच, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटचा वापर करत होते. प्रत्यक्ष संभाषणासाठी इन्स्टाग्राम तर संदेश पाठवण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करत होते. मुख्य आरोपी शुभम लोणकर समाजमाध्यमे हाताळणीत तरबेज असून त्यानेच इतरांना संवादासाठी या समाजमाध्यमांचा वापर करण्याची सूचना केली होती.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Election Commission Press Conference : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला! एका क्लिकवर वाचा सर्व अपडेट

घटनास्थळाजवळ पिस्तूल सापडले

सिद्दीकी यांची हत्या घडलेल्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर निर्मल नगर पोलिसांना बेवारस अवस्थेत एक बॅग मंगळवारी सापडली. त्यात ७.६५ बोअरचे पिस्तूल आणि काही कागदपत्रे होती. सापडलेले पिस्तूल सिद्दीकी यांच्या हत्येसाठी वापरले होते का, याच्या पडताळणीसाठी गुन्हे शाखेकडून रासायनिक चाचणी केली जाणार आहे. सिद्दीकी यांना लागलेल्या गोळ्या व पिस्तुलातील पुंगळ्यांची जुळवणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.