सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का?
डोंबिवली : राम मंदिर (Ram Temple) उद्घाटन म्हणजे श्रेय घेण्याचं राजकारण आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचं मोठं योगदान असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तिकडे गेले, तर शिवसेनेचा जयजयकार होईल म्हणून आमंत्रण देणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रत्युत्तर दिलं आहे.
सोमय्या म्हणाले, संजय राऊत स्वतः ची मिमिक्री उद्धव ठाकरेंवरती करतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवं वस्त्र परिधान केलं. सोनियांचा जयजयकार केला. सावरकरांना शिव्या घालण्याचं काम केलं.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? त्यांचं सरकार गेलं. लोकांनी कायमचा रामराम केल्याचा निर्धार केलाय, त्यामुळं रावण सेनेनं रामाचं नाव घेताना थोडीशी बाळगावी. स्वतःची चेष्टा करून घेण्याचा शोक संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना आहे, असा टोलाही सोमय्या यांनी डोंबिवलीत लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.