मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली ही समिती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
समितीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर विश्वास टाकल्याचं बोललं जात आहे.