'संजय राऊत... माझ्या पत्नीची माफी मागा, सोमय्यांकडून मानहानीचा खटला'

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal
Updated on

किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यानंतर संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा टॉयलेट घोटाळा (Toilet Scam) लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे. त्याबाबत राऊतांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील ट्वीट केला. (Kirit Somaiya News)

यानंतर सोमय्यांनी पुन्हा राऊतांवर आरोप करत त्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. टॉयलेट घोटाळ्यातील आरोपांवर राऊतांना ४८ तासांत माफी मागावी लागेल, असा अल्टिमेटम सोमय्यांनी दिलाय. आमची लढाई भ्रष्टाचार विरोधी आहे. या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असं सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya toilet scam)

Kirit Somaiya
सोमय्यांचा 'टॉयलेट' घोटाळा बाहेर काढणार, राऊतांचा इशारा

मिरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले होते. त्यावर सोमय्यांनी,धडा शिकवण्यासाठी संजय राऊत यांना माफी मागवी लागेल, असं म्हटलंय. पुढच्या आठवड्यात मुलुंड पोलीस स्टेशनला मेधा सोमय्या तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांचं चारित्र्य हनन केलं आहे. २० दिवस ते सतत बोलत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तुम्ही फक्त बोलता पण एकही कागद दिला नाही, असं सोमय्यांनी म्हटलंय.

Kirit Somaiya
राऊतांच्या आरोपांनंतर सोमय्यांचं थेट आयुक्तांना पत्र, IAS अधिकारी निशाण्यावर?

काय आहे शौचालय घोटाळा?

मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळालं. त्यांचं युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आलं. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.