शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सोमय्यांनी पाटकरांवर ३८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पाटकरांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. (Case registered against Sanjay Raut friend Sujit Patkar)
सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक मित्रही आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुजित पाटकरांविरोधात तक्रार करुनही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ३८ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी हॉस्पिटल व्यवस्थापनाचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुजित पाटकर आणि सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रं बनवली. तसं त्याच्या आधारे जम्बो कोविड सेंटरमधील वैद्यकीय सेवा पुरवण्याबाबातचं कंत्राट मिळवलं, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.