Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
Baba Siddiqui
Baba SiddiquiESakal
Updated on

Baba Siddiqui Murder: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. सिद्दीकी यांच्यावर 2 ते 3 राऊंड गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्याआधी त्यांचा मृत्यू झाला. जीशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार झाल्याचे समजते. खेरवाडी सिग्नलजवळ ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे.

या घटनेनंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अत्यंत दुर्देवी घटना आहे. तीन आरोपीपैकी दोन आरोपीना अटक झाली आहे. त्यातील एक उत्तरप्रदेश, दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था हाती घेता कामा नये. गँगवारने तोंड वर काढू नये, अशा मी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Baba Siddiqui
Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

तर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, बाबा सिद्दीकीची हत्या ही चिंतेची बाब आहे. सरकारने एक विशेष टीम बनवून याची चौकशी करावी. हे खूप मोठे षडयंत्र असल्याचे दिसते. कठोर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही, कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूमिकेचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अभिनेता सलमान खानला मदत केल्याप्रकरणीस हा गोळीबार करण्यात आल्याची चर्चा आहे. सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र मानला जातो. तर परिसरातील पुर्नविकासा प्रकरणी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे हे एक कारण सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.