मुंबईकरांसाठी मोठी बातमी, महापौरांकडून 'अनलॉक'चे संकेत

kishori pednekar
kishori pednekarTeam eSakal
Updated on

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आर्थिक राजधानी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता वाढली आहे. तिसऱ्या लाटेत दररोज २० हजारांहून अधिक रुग्ण सापडत असताना हा आकडा आता एक हजारांच्या खाली आला आहे. (Mumbai Unlock)

त्यामुळे लवकरच मुंबई अनलॉक होण्याच्या वाटेवर आहे. यासंदर्भात अतिरिक्त पालिका आयुक्तांनी माहिती दिली होती. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचं वक्तव्य केलंय. (Mayor Kishori Penekar)

मुंबईत लवकरच अनलॉक

येत्या आठवड्यात मुंबईत १००% लसीकरण पूर्ण होईल. सध्या १५ ते १८ वयोगटातील प्रतिसाद कमी आहे, पण लवकरच त्याचीही पूर्तता होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

फेब्रुवारी शेवट पर्यंत अनलोकमध्ये आम्ही जाऊ, असं आयुक्त म्हणाले आहेत. लवकरच सगळं चालू होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. 'अनलॉक'साठी मुख्यमंत्री आणि पूर्ण टीम आग्रही आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात तथ्य नाही. सध्या मुंबईत एकच इमारत बंद आहे. ८ दिवसात ती देखील उघडेल. त्यामुळे अनलॉकच्या दिशेने आपण आहोत,असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत निर्बंध शिथील करणार असल्याचे संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.