Mumbai: गणेशोत्सवाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे २०२ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्याचे आरक्षण रविवारी सकाळी सुरू होताच अवघ्या एका मिनिटात गणपती विशेष गाड्या हाऊसफुल्ल झाल्याची माहिती समोर आली. अनेक प्रवासी तिकिट काढत असताना त्यांना गाड्या रिग्रेट झाल्याचा संदेश आला आहे.
यंदा लाडक्या गणरायाचे आगम ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकणासाठी २०२ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली.तरीही
यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकिटं फुल्ल झाल्याची माहिती समोर आली. २०२ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले.
मात्र, आरक्षण सुरु होताच एका मिनिटात त्या गाड्या फुल्ल झाल्याचे निदर्शनास आले. तर मागच्या-पुढच्या तारखेची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश झळकत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
ट्रेन क्रमांक ०११६७ एलटीटी-कुडाळ गणपती विशेष एक्सप्रेस ४सप्टेंबर,५सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला रिग्रेट दाखवत आहे. तर,
ट्रेन क्रमांक ०११८५ एलटीटी-कुडाळ गणपती विशेष ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर तर ट्रेन क्रमांक ०११५१ सीएसएमटी- सावंतवाडी गणपती विशेष ५ सप्टेंबर रोजी गाड्या रिग्रेट दाखवत आहे. त्यामुळे प्रवाशांची हिरमोड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.