Thane: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात आपआपले नशीब आजमावत आहेत.
यासाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय मतदारांची जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाणेकर मतदारांच्या हाती भावी पदवीधर आमदार निवडून आणण्याची दोरी असल्याचे बोलले जात आहे.
कोकण पदवीधर निवडणुकीची घोषणा होताच, सर्वात आधी मनसेने उमेदवाराची अधिकृत घोषणा केली, मात्र अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्षाने माघार घेतली. त्यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत २५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले, पण माघार घेण्याच्या दिवशी १२ जणांनी अर्ज मागे घेतले.
यामुळे ही लढत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. २६ जून रोजी मतदान होणार असल्याने या निवडणुकीकडे आता लक्ष लागून राहिले आहे. त्यात दोन लाख २३ हजार २२५ मतदारांमध्ये ९५ हजार ५४७ महिला, तर एक लाख २७ हजार ६५० पुरुष आणि २८ तृतीयपंथी मतदार आहेत.
त्यामुळे याच मतदारांच्या हाती विधानपरिषदेत जाण्याचा उमेदवाराचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे हे मतदार नेमके कोणाचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करणार, हेच पाहावे लागणार आहे.
जिल्हा पुरुष महिला तृतीयपंथी
ठाणे ५६,३७१ ४२,४७८ ११
पालघर १५,९३० १२,९८७ ०८
रायगड ३०,८४३ २३,३५६ ०९
रत्नागिरी १३,४५३ ०९,२२८ ००
सिंधुदुर्ग ११,०५३ ०७,४९८ ००
एकूण १,२७,६५० ९५,५४७ २८
काँग्रेसचे रमेश कीर रमेश, भाजपचे निरंजन डावखरे, भीमसेना पार्टीचे विश्वजित खंडारे, तर अपक्ष म्हणून अमोल पवार, अरुण भोई (प्राचार्य), अक्षय म्हात्रे, गोकुळ पाटील, जयपाल पाटील, नागेश निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद पाटील, ॲड. शैलेश वाघमारे, श्रीकांत कामुर्ती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.