Konkan Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, कोकण रेल्वे दादर पर्यंत धावणार

Konkan Railway: प्रवाशांनो लक्ष द्या, कोकण रेल्वे दादर पर्यंत धावणार
Updated on

Kokan News: मुंबई सीएसटी येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणासाठी दर शनिवारी आणि रविवारी कोकण रेल्वेच्या काही गाड्या ह्या दादर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असून काही गाड्या दादर रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत. या बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.(maharashtra Konkan News)

सीएसटी स्थानकावरील फलाटाच्या कामाची सुरुवात होणार असल्याने १७ ते ३१ मे या कालावधीमध्ये काही गाड्यांच्या स्थानकामध्ये बदल केला आहे. तसेच एक आणि दोन जूनला ही हा बदल राहणार आहे.

यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव मुंबई सीएसटी तेजस एक्सप्रेस, मंगळूर ते सीएसटी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस या दादर पर्यंत धावणार आहेत.(railway News)

या गाड्या शनिवारी १८ मे रोजी दादर पर्यंत धावतील. तसेच मुंबईहून सुटणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, माडवी एक्सप्रेस या गाड्या १८ आणि १९ मे रोजी दादर येथून सोडल्या जाणार आहेत.

हे वेळापत्रक २१ आणि २१ मे रोजी ही राहणार आहे. तसेच जूनला एक आणि दोन तारीखला ही हे वेळापत्रक राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.