खवय्यांसाठी खुशखबर...कोकणचा हापूस आता थेट तुमच्या दारी!

खवय्यांसाठी खुशखबर...कोकणचा हापूस आता थेट तुमच्या दारी!
खवय्यांसाठी खुशखबर...कोकणचा हापूस आता थेट तुमच्या दारी!
Updated on

ठाणे : कोरोनाच्या संकटामुळे चिंताग्रस्त झालेल्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ठाणेकरांनी साथ दिल्याने मदतीचा मोलाचा हातभार लाभला आहे. 'शेतकऱ्याची भाजी, आपल्या दारी' या यशस्वी उपक्रमानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सिताराम राणे यांच्या प्रयत्नाने लॉकडाऊन काळातसुदधा कोकणातील मधुर हापूस आंबा ठाणेकरांना थेट दारी मिळत आहे. या उपक्रमादवारे गेल्या काही दिवसात देवगड हापूसच्या दोन हजार पेटयांची विक्री  झाली आहे.

 जगात कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. दरवर्षी आंब्याची निर्यात 100 कोटीच्यावर होते तसेच, 350 कोटीच्यावर देशात विक्री होते. ठाणे शहरातदेखील गेली 14 वर्ष आंबा महोत्सव भरवून कोकणातील शेतकऱ्यांची ही चळवळ आ.संजय केळकर यांनी सुरू ठेवली. यंदा मात्र कोरोनामुळे आंबा महोत्सव होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार होतं. त्यासाठी हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात आंबा आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून गेल्या काही दिवसात वाजवी दरात थेट गृहसंकुलात देवगड हापूसच्या तब्बल 2 हजार पेट्यांची विक्री करण्यात आली आहे. ज्या गृहसंकुलातील खवय्यांना अस्सल हापुसची चव चाखायची असेल त्यांनी,समूहाने (किमान 25 पेट्या ) नोंदणी केल्यावर थेट गृहसंकुलात आंबा पोहचवला जातो.

ग्रामीण भागात रोजगार
विक्री कौशल्य नसल्यामुळे किंवा विक्री करण्याची मानसिकता नसल्यामुळे शेतकरी स्वतः पिकवलेला मालाची विक्री करु शकत नाहीत.तेव्हा,शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना,तरुणांना या विक्री प्रक्रियेत समाविष्ट करून घेता येईल.किंबहुना,भविष्यात गृहनिर्माण संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला इतरही शेतमाल अडत्यांचा अडसर दूर करून विकण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

अशाप्रकारे आंबाविक्रीची ही पहिलीच वेळ आहे.भविष्यात ही योजना सर्व मोठ्या शहरांमध्ये करणे शक्य होणार असून अशा प्रकारची व्यवस्था कडधान्य व इतर शेतीपूरक वस्तूंबाबतदेखील केल्यास दलालांचे उच्चाटन होऊन पैसा थेट शेतकऱ्यांना मिळेल. 
- सीताराम राणे - अध्यक्ष, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.