मुंबई : काल केरळच्या कोझिकोडमध्ये एक भीषण अपघात घडला. दृश्यमानता कमी असल्याने विमान धावपट्टीवरून सरकलं आणि पुढे दरीत पडून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांच्या दुर्दैवी मृत्यू झालाय.यापैकी एक वैमानिक हे मुंबईचे रहिवासी होते. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९१ लोकं होती. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक वसंत साठे हे मुंबईतील पवई भागात राहणारे होते.
कोण होते दीपक वसंत साठे ?
दरम्यान, विमान दुर्घटनेची माहिती मिळताच साठे यांच्या परिवारात शोककळा पसरली. हा अपघात इतका भीषण होता की ३५ फूट खाली दरीत विमान कोसळून बलाढ्य बोईंग ७३७ विमानाचे अक्षरशः तुकडे दोन तुकडे झालेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन हे विमान परतत होतं. या विमानातील एकूण नारिकांपैकी १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येतेय. या घटनेत को पायलट अखिलेश कुमार यांचा देखील मृत्यू झालाय.
दरम्यान, या अपघाताच्या खोलात जाऊन हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत DGCA आता सखोल चौकशी करणार आहे. या विमानातील डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर देखील आता हस्तगत करण्यात आलाय.
Kozhikode Air India Express crash pilot deepak vasant sathe and his life journey
Mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.