Lalbagh Raja : लालबागच्या राजाला ७२ हजारांचा दंड; एफ दक्षिण विभागाने बजावली नोटीस

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन करत मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता.
 Lalbaugcha raja
Lalbaugcha rajaesakal
Updated on

मुंबई - लालबागच्या राजाच्या मंडप परिसरात ३६ खड्डे निदर्शनास आल्याने पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजा मंडळाला प्रती खड्डा दोन हजार रुपये प्रमाणे ७२ हजारांचा दंड भरण्याची नोटीस बजावल्याचे पालिकेच्या एफ दक्षिण विभागाकडून सांगण्यात आले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन करत मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता. मंडप परिसरात खड्डे आढळल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येईल, असा इशारा ही पालिका प्रशासनाने दिला होता.

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडप परिसरात तब्बल ३६ खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला एफ दक्षिण विभागाने प्रती खड्डा दोन हजार रुपये प्रमाणे ७२ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली.

पालिकेची नोटीस मिळताच लालबागच्या राजा मंडळाने ७२ हजार रुपये दंडाची रक्कम भरल्याचे एफ साऊथ विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानगी देतानाच पालिका मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले जाते.

लालबागच्या राजा मंडळाला दरवर्षी खड्डे पडल्याने नोटीस बजावण्यात येते. यंदाही ३६ खड्डे मंडप परिसरात पाडल्याने नोटीस बजावण्यात आली असता दंडाची ७२ हजारांची रक्कम भरल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.