नवी दिल्ली : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. फडणवीस हे शांतपणे अत्यंत खोटं बोलत आहेत, असा आरोप अंधारे यांनी केला आहे. ललित पाटीलला का वाचवलं जात आहे? असा सवालही अंधारे यांनी केला आहे. (Lalit Patil drug case Devendra Fadnavis is quietly telling huge lie allegation of Sushma Andhare)
देवेंद्र फडणवीस अत्यंत शांतपणे खोट बोलत आहेत. विधानपरिषदेच्या सभापती असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी आपल्या खुर्चीचा आदर राखत ललित पाटील बाबत माहिती देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं केलं नाही. नीलम गोऱ्हे पुण्यात राहतात त्यांना माहिती नव्हत का? धंगेकर यांना सभागृहात पाटील विषयावर का बोलून दिलं नाही? जे त्यांना माहिती होतं, असा सवाल यावेळी फडणवीसांनी विचारला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, फडणवीसांनी आमच्या पक्षाची चिंता करू नका, ललित पाटीलला का वाचवलं जात आहे? अनेक जणांवर कारवाई केली. आमचा पदाधिकारी आहे म्हणून कारवाई करत नाही का? एका राज्याचे गृहमंत्री आहात, त्या दृष्टीने कारवाई करा, असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनात लोकाभिमुख प्रश्न मांडले जातील असं वाटलं होतं, पण सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रश्न गुंडाळले. ललित पाटील प्रकरणावर काय कारवाई झाली? यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. यामुळं मोठा नेक्सस बाहेर येईल असं म्हटलं पण तसं झालं नाही. फडणवीसांनी गोलमटोल उत्तरं देत फक्त जागतिक अंमलीपदार्थांवर बोलले. (Marathi Tajya Batmya)
नाशिकमध्ये गुन्हा केला त्याला कोण कोण मदत करत होतं. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता? ललित पाटील कधीही आमच्या शिवसेनेचा नव्हता, आमच्याकडं मातोश्रीवर फोटो असेल पण आमच्याकडं त्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यासोबत पाटील मातोश्रीवर आला. ललित पाटील याला दादा भुसेंनी मातोश्रीवर आणले होते, जो फोटो समोर येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.