दरड डोंगर उतारावर असलेल्या कच्या झोपड्या असलेल्या माँ काली चाळीतील सहा घरांवर पडली आहे. कोसळलेले मोठे चार ते पाच दगड हे आकाराने छोट्या घराएवढे आहेत.
कळवा - मागील काही दिवसांपूर्वी घोळाई नगर येथे दरड कोसळून 5 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी(ता 7) ला रात्री 10 ते साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा कळवा पश्चिमेच्या इंदिरानगर येथे दरड (भूस्खलन) कोसळली. ही दरड डोंगर उतारावर असलेल्या कच्या झोपड्या असलेल्या माँ काली चाळीतील सहा घरांवर पडली आहे. कोसळलेले मोठे चार ते पाच दगड हे आकाराने छोट्या घराएवढे आहेत. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.
खबरदारी म्हणून २० ते २५ घरे रिकामी करून तेथील कुटुंबियांना कळव्यातील घोलाई नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केलं आहे. याबाबतची माहिती ठाणे महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. शनिवारी रात्री 10 ते साडेदहाच्या सुमारास अचानक डोंगरावरून मोठे दगड घरंगळत येण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दगड ज्या भागातुन कोसळण्याचा आवाज येऊ लागल्यावर येथील नागरिक सावध होऊन घराबाहेर पडले. काही वेळातच मोठे दगडासह माती मिश्रीत दरड सहा घरांवर कोसळली.
दरड ज्या घरांवर कोसळली त्या माँ काली चाळीतील बाबू शेख, सागर चतुर्वेदी, भारती, दशरथ लाल कोरी,अशोक विश्वकर्मा आणि कन्हैया विश्वकर्मा यांच्या घरांचा समावेश आहे. शनिवारी रात्री दगड मिश्रीत दरड पडलेल्या घटनेची माहिती मिळताच, कळवा पोलीस, ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी फायर इंजिन आणि क्यूआरव्ही यांना पाचारण केले होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
घराच्या भिंतीना भगदाड पडले असून पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे. तसेच घरात माती आणि दगड पडले आहेत. रात्रीची वेळ असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल झाले येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे सावधगिरी म्हणून तेथील एकूण २० ते २५ कुटुंबियांना तेथूल तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या शाळेत आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने स्थलांतरित केल्याची माहिती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.