डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍; देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज

अर्ज करणाऱ्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Dr. Homi Bhabha University
Dr. Homi Bhabha Universityesakal
Updated on
Summary

बीए मानसशास्त्रला विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मोठा कल समोर आला आहे. तसेच एमए मानसशास्त्र (अप्लाईड सायकॉलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता ही २० जागांची आहे.

मुंबई : ज्ञान, तंत्रज्ञानाच्या जगात मानसिक शांतता आणि त्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले असून प्रत्येक क्षेत्रात समुपदेशक आणि त्याची मोठी निकड निर्माण झाली आहे. याच मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात (Dr. Homi Bhabha State University) बीए मानसशास्त्र पदवीच्या (BA Psychology Degree) अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. यामुळे या विद्यापीठात बीए मानसशास्त्र या विषयाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून आला आहे.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी, पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश‍ प्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत नामांकित महाविद्यालयांमध्ये नोंद असलेल्यांपैकी एलफिन्स्टन महाविद्यालय आणि सिडनॅहम महाविद्यालयांसोबत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही महाविद्यालये येतात.

Dr. Homi Bhabha University
NEET Exam Scam : 'नीट' घोटाळ्याची सिंधुदुर्गातही पाळेमुळे? 'हा' वादग्रस्त ठरलेला संशयित शिक्षक तब्बल 20 वर्षे होता जिल्ह्यात!

यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया ही वेगात सुरू असून यात बीए मानसशास्त्र या अभ्यासक्रमासाठी १२० प्रवेश क्षमता असताना विद्यार्थ्यांची अधिक मागणी वाढल्याने या प्रवेशासाठी तब्बल २७० हून अधिक विद्यार्थ्याानी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज करणाऱ्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामुळे ही मागणी अधिक वाढल्यास विद्यापीठाला या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत अधिक वाढ करण्याची गरज निर्माण होणार असल्याचेही सांगण्यात येते.

Dr. Homi Bhabha University
Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याचा डिस्टिलरी परवाना निलंबित; राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांची मोठी कारवाई

समुपदेशक होण्याची संधी

बीए मानसशास्त्र आणि एमए मानसशास्त्र हे पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विषयांत देशात आणि जगभरात संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, शिवाय तातडीने समुपदेशक होण्यासाठी हे अभ्यासक्रम महत्वाचे ठरणार आहेत.

बीए मानसशास्त्रला विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मोठा कल समोर आला आहे. तसेच एमए मानसशास्त्र (अप्लाईड सायकॉलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता ही २० जागांची आहे. मात्र या प्रवेशासाठी देखील १२४ हून अध‍िक विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसतोय.

-डॉ. विलास पाध्ये, कुलसचिव, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

ज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना मानसिक शांतता आणि त्यासंबंधीचे आरोग्य जपण्यासाठी समुपदेशक आदींची मोठी निकड निर्माण झाली आहे. यामुळे विद्यापीठातील हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रभावी असे अभ्यासक्रम सुरू असून विद्यापीठाचे हे उच्च शिक्षणातील पुढचे पाऊल ठरणार आहे.

-डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()