Lavani Gaurav Awards 2024 : पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान! यंदाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर

बुधवार ता. 12 रोजी उपस्थित कार्यकरणी यांच्या सहमतीने 'लावणी गौरव पुरस्कारांची घोषणा' केली आहे.
Lavani Gaurav Awards 2024 announced  award ceremony will be held on July 10 Shri Shivaji Mandir in Dadar
Lavani Gaurav Awards 2024 announced award ceremony will be held on July 10 Shri Shivaji Mandir in Dadar
Updated on

धारावी, ता. 16 जून : लावणी कलावंत महासंघ गेली दहा वर्षांपासून कलाक्षेत्रातील मंचावरील व मंचाच्या म्हणजे पडद्यामागील कलाकारांना सर्वोतपरी सहकार्य करणारी संघटना म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष -संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त - जयेश चाळके, अध्यक्ष - कविता घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ता. 12 रोजी उपस्थित कार्यकरणी यांच्या सहमतीने 'लावणी गौरव पुरस्कारांची घोषणा' केली आहे. हे पुरस्कार संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनी वितरीत केले जाणार आहेत.

लावणी गौरव 2024 पुरस्काराचे मानकरी

●गोविंद हडकर - तालवादक

●राधा धारेश्वर - पार्श्वगायिका

●आकांक्षा कदम - लावण्यवती

●बाळासाहेब आहिरे - निर्माता

●विठ्ठल कदम - शाहीर

●प्रमोद कांदळकर - पुरुष लावणी कलावंत

●यशवंत शिंदे - लोककलावंत बतावणी

●सूचित ठाकूर - निवेदक

●किरण काकडे - नृत्य दिग्दर्शक

●उल्हास सुर्वे - नेपथ्यकार

'राजा राणी पुरस्काराचे मानकरी'

●श्री व सौ.सुचित्रा जयेश चाळके

बुधवार ता. 10 जुलै रोजी 'पुरस्कार सोहळा' संध्याकाळी 4.30 वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. महासंघाच्या अध्यक्षा कविता घडशी, सरचिटणीस विशाल सदाफुले व खजिनदार योगिता मोर्जे यांनी पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.