Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

Lawrence Bishnoi: काल रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान आता बिश्नोई गँगने फेसबुकवर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
NCP Leader Baba Siddique Shot Dead
NCP Leader Baba Siddique Shot Dead
Updated on

Bishnoi gang finally took responsibility for Baba Siddiqui's murder:

काल रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान आता बिश्नोई गँगने फेसबुकवर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

गँगच्या एका सदस्याने फेसबुक पोस्ट करत सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सिद्दीकींचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ही हत्या केली आहे."

Bishnoi Gang Facebook Post
Bishnoi Gang Facebook PostEsakal

फेसबुक पोस्टमध्ये काय?

बिश्नो टोळीचा दावा आहे की, त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबत मकोका कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
Baba siddique news: सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात राहत होते?

मुंबई पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. करनैल सिंग, धर्मराज आणि शिवकुमार अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज यांना अटक केली असून, शिवकुमारचा शोध सुरू आहे. या घटनेमागील सूत्रधाराचाही पोलीस शोध घेत आहेत.

शिवकुमार आणि कर्नेल हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून धर्मराज हरियाणातील असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची पाहणी केली होती. दीड ते दोन महिने ते मुंबईत असून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.

काल रात्री घटनास्थळी सहा राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. मुंबई क्राइम ब्रँचची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

NCP Leader Baba Siddique Shot Dead
State Funeral For Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.