डोंबिवली : भाषा ही इतिहास, संस्कृती यांची संवाहक आहे याचे भान आपण ठेवले पाहीजे. विदेशी भाषा (Foreign language) शिकण्यास हरकत नाही, परंतू भारतीय भाषा (Indian Language) शिकणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय भाषा ही भाषा भगिनींचा एक समूह आहे. भारतीय भाषेतील समानतेचे आपल्याला आकलन असत नाही अनेकदा हे आपले दुर्दैव आहे. जागतिकीकरणाचा ( Globalization) रेटा पहाता भारतातील विद्यार्थ्यांना (Indian students) जगाच्या भाषा शिकणे आणि जगातील विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान पोहोचविणे ही प्रक्रीया आता आवश्यक ठरली आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात भारताला आपल्या स्वतःच्या संस्कृतीची ओळख जगाला पटवून देण्यासाठी भाषासंवर्धिनी सारखे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत असे मत राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (Dr Vinay Sahasrabuddhe) यांनी डोंबिवलीत येथे व्यक्त केले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली यांच्या वतीने भाषावर्धिनी भाषाकेंद्राचे उद्घाटन खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच कै. आबासाहेब पटवारी कक्षचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संदीप घरत, श्रीकांत पावगी, आशीर्वाद बोंद्रे, अर्चना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. भाषावर्धिनी हे परदेशी भाषा प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये जर्मन, फ्रेंच, जॅपनीज व स्पॅनिश या चार भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी खासदार डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी बोलताना वरील मत व्यक्त केले.
डॉ. सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, जगातील लोकांनी भारतीय भाषा शिकाव्यात हे घडून यायला आणखी काही काळ जावा लागेल मात्र भारतीय लोकांनी परदेशी भाषा शिकून परदेशी भाषेतील ज्ञान संपादन करुन भारतीय संस्कृती ही परदेशी भाषांच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचे काम हे अशा प्रकारच्या भाषावर्धिनीच्या उपक्रमांमुळे होणार आहे. भाषा ही इतिहास, संस्कृती यांच्यासोबत येत ्सते याचे भान भाषा शिकणाऱ्यांना ठेवायला हवे.
स्पेन, जर्मन, स्पॅनिश यासोबतच उझबेक, बर्नीज, कझाक या आपल्या शेजारील देशांच्या भाषाही आपण शिकल्या पाहीजे. आज जागतिक राजकारणात भारत भूमिका बजावतो, या सर्व छोट्या विकसनशील देशांचा प्रमुख म्हणून भारत काम करतो. जर आपण त्यांच्या भाषांना योग्य सन्मान दिला, त्या आपण आत्मसात केल्या तर हळूहळू तेथे आपली भाषा आत्मसात केली जाईल. डोळसपणाने जागतिक राजकारणाचा एक व्यूहात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्याला विदेशी भाषांच्या विकासाबद्दलची एक नीती, धोरण आखावे लागेल, अंगिकारावी लागेल व त्यादृष्टीने काम करावे लागेल असेही ते म्हणाले.
भारतीय साहित्या ला नोबेल नाही...
भारतीय साहित्यिकांचे साहित्य हे अजरामर ठरले आहे, मात्र त्यांना नोबेल मिळाले नाही याचे कारण भारतीय साहित्यकृतींचा जगात व्यापक स्वरुपात जागतिक भाषांमध्ये अनुवाद व्हायला हवा, त्यासाठी कोणती यंत्रणा आज आपल्याकडे अस्तित्वा नाही. साहित्य अकादमी सारखी संस्था आहेत, प्रत्येक भाषेच्या साहित्य परिषद आहेत, मात्र दुर्दैवाने त्यांचा विस्तार लहान असून त्यांना जागतिक भरारी मारता आली नाही. ते झाले असते तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळणाऱ्या साहित्यिकांच साहित्य जागतिक भाषेत अनुवादित झाले असते तर भारतीय साहित्यकृतीला दोन चार नोबेल पुरस्कार मिळाले असते याबद्दल माझ्या मनात संदेह नाही असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भूमिकेचे केले समर्थन
राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वासाठी अनुकूल राहीली आहे. त्यांनी हिंदूत्वावर भर दिला असेल तर हिंदूत्वाच्या भल्यासाठीच आहे. मशिदिवरील भोंग्या संदर्भात राज यांनी घेतलेल्या भूमिकेच स्वागत केले पाहीजे. खऱ्या अर्थाने सलोखा आणि सामंजस्याने नांदायचे असेल तर कुणालाही विशेष अधिकारी देता कामा नये असे स्पष्ट मत भाजपा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी डोंबिवली येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत मांडले. राज हे भाजप समर्थनार्थ बोलत असल्याची चर्चा कालपासून सुरु झाली आहे यावर बोलताना ते म्हणाले, राज हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख असून ते त्यांचा मार्ग निवडतील, अटकळबाजीच्या माध्यमातून पतंग उडवण्याला काही अर्थ नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.