Leopard: शेरे परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद; 8 ते 9 वेळा झाले दर्शन

Thane: वनविभागाकडून कोणतेही ठोस उपाययोजना होत नसल्याने परिसरातील रहिवाश्यामध्ये घबराट पसरली आहे.
: शेरे परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद; 8 ते 9 वेळा झाले दर्शन
Leopardsakal
Updated on

Shahapur: शहापुर तालुक्यातील शेरे गावाच्या परिसरात 8 ऑगस्टच्या मध्यरात्री एका घरासमोर बिबट्याचा वावर सीसीटीव्ही त कैद झाला असून ह्या परिसरात बिबट्या दिसून येत असूनही वनविभागाकडून कोणतेही ठोस उपाययोजना होत नसल्याने परिसरातील रहिवाश्यामध्ये घबराट पसरली आहे.

समृद्धी महामार्ग हा शहापूर तालुक्यातील बहुतांशी जंगल भागातून जात असल्याने ,सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या खडखडाटामुळे वन्यजीव मानवी वस्ती कडे वळू लागले असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यात 8/9वेळा बिबट्या रहिवाश्याच्या निदर्शनास आल्याने येथे जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.

येथील कलम पाडा, भातसई, शेरे,शेई ,अंबर्जे,मासवणे, आंबिवली,बावघर, वेहले या गावांमधील नागरिकांना गेल्या सहा महिन्यापासून 9 वेळा बिबट्या निदर्शनास आला असल्याने भीतीचे वातावरण आहे.

मार्च 2024 मध्ये 4 वेळा येथील पाळीव कुत्रे,कोंबड्या यांच्यावर बिबट्याने हल्ले केले आहेत तर 8 ऑगस्ट ला मध्यरात्री 3 वाजेदरम्यान हरेश तारमळे यांच्या अंगणात हा बिबट्या सीसीटीव्ही त कैद झाला असून येथे बिबट्या वारंवार येत असल्याने यघबराट पसरली आहे.ह्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे,एकट्याने घराबाहेर पडण्याचे धाडस करू नये, घराबाहेरील विजेचे दिवे सुरू ठेवावेत. फटाके किंवा वाद्य वाजवावे नागरिकांनी रात्री येथील रस्त्यावरून दुचाकीवरून जाणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात वनविभागाकडून करण्यात आले आहे.याबाबत वरिष्ठ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

: शेरे परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद; 8 ते 9 वेळा झाले दर्शन
Uddhav Thackeray In Thane: 'घालीन लोटांगण वंदीन चरण'; उद्धव ठाकरेंच्या 'जिव्हारी' लागण्यासारखे ठाण्यात बॅनर्स, सभेआधी तणाव

"बिबट्या गेल्या 5/6महिन्यापासून शेरे-शेई विभागात वारंवार निदर्शनास येत असल्याची बाब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितली आहे,पण ह्या बिबटयाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने हालचाली करून येथील रहिवाश्याचा नाहक बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी."विकास डोंगरे,स्थानिक रहिवाशी.

"याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले असून स्थानिक रहिवाश्याचे प्रबोधन करून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे."साईनाथ साळवी,वनविभाग अधिकारी, शेरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.