मुंबई : नॅशनल पार्क परिसरात बिबट्याची दहशत कायम; उपाययोजनेसाठी CM ठाकरेंना साकडे

Leopard
Leopard sakal Media
Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील (Sanjay Gandhi National Park) निवासी भागात बिबट्याचे (Leopard) वारंवार दर्शन घडत आहे. त्यामुळे निवासी क्षेत्रात चिंता पसरली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली असून त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना (uddhav Thackeray) साकडे घालण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील निवासी भागात अनेकदा बिबट्या फिरताना आढळला आहे. त्याला पकडण्यासाठी मास्टर प्लॅन (Master plan) तयार करण्यात येणार होता.

Leopard
‘XE व्हेरिएंट’च्या अहवालाची BMC ला प्रतीक्षा; उपप्रकाराबाबत मिळणार माहिती

त्यासंबंधीची अधिसूचनाही ५ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली. अधिसूचना राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत स्थानिकांशी सल्लामसलत करून दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, त्यावर काहीही अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. झोनल मास्टर प्लॅनला त्वरित मंजुरी द्यावी आणि उद्यानाच्या आसपासच्या निवासी परिसरात लपून बसलेल्या वन्यप्राण्यांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनस्पती आणि जीवजंतूंच्या अनेक लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे घर आहे. त्यात सुमारे १३०० प्रजातींच्या फुलांच्या वनस्पती, सस्तन प्राण्यांच्या ४५, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४३, सापांच्या १२, उभयचरांच्या ३८ आणि विविध फुलपाखरांच्या ५० प्रजाती आढळतात. ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेचा उद्देश पर्यावरणीय दृष्टिकोनातून इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून या क्षेत्राचे संरक्षण करणे हा आहे.

तातडीने कार्यवाही करा

शुक्रवारी गोराई परिसरातील कोळीवाड्यातील दाट लोकवस्तीच्या परिसरात आज पुन्हा बिबट्या दिसला. मात्र, वन विभागाचे अधिकारी त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसते. त्यामुळे तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्राय पिमेंटा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.