Rashmi Shukla: पोलिस महासंचालकांचे नागरिकांना पत्र ; पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली

तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी असल्याचे, रश्मी शुक्ला यांनी पत्रात म्हटलं आहे | Rashmi Shukla has said in the letter that it is our responsibility to win your trust
Rashmi Shukla: पोलिस महासंचालकांचे नागरिकांना पत्र ; पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली
Updated on

Maharashtra Police: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. रश्मी शुक्लानी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली स्वतः पोलीस महासंचालकांनी पत्राद्वारे दिली आहे.

मुंबईत नुकतच झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलीस महासंचालकांचे पत्र चर्चेत आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी असल्याचे, रश्मी शुक्ला यांनी पत्रात म्हटलं आहे

Rashmi Shukla: पोलिस महासंचालकांचे नागरिकांना पत्र ; पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली
Rashmi Shukla: महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांच्या नियुक्तीची अखेर घोषणा

शुकलांचे मनोगत

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दारावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, राज्यातील सर्व पोलीस कर्मचारी तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहू. असा विश्वास रश्मी शुक्ला यांनी पत्रात व्यक्त केला.

Rashmi Shukla: पोलिस महासंचालकांचे नागरिकांना पत्र ; पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली
Rashmi Shukla: रश्मी शुक्लांचं पोलीस महासंचालकपद पुन्हा वेटिंगवर! महायुतीमधील नेत्यांच्या त्या भूमिकेमुळं अडचण

पहिल्या महिला पोलीस महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. . राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांपैकी एक आहेत. सशस्त्र सीमा बळाचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती

Rashmi Shukla: पोलिस महासंचालकांचे नागरिकांना पत्र ; पोलीस दलावरील विश्वास कमी झाल्याची कबुली
Rashmi Thackeray : शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे यांची एन्ट्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.