Mumbai : वीज बिल भरले नसल्याचे सांगत शिक्षिकेची 2 लाखाला फसवणूक

तुम्ही मागील महिन्यात वीज भरले आहे परंतू ते सिस्टीमला अप़डेट झाले नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल कल्याण मधील शिक्षिकेची फसवणूक
fraud
fraud sakal
Updated on

डोंबिवली : तुम्ही मागील महिन्यात वीज भरले आहे परंतू ते सिस्टीमला अप़डेट झाले नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल असे सांगत एका भामट्याने कल्याण मधील शिक्षिकेची तब्बल 2 लाखाला ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात शिक्षिका अनिता जाधव (वय 54) या रहाण्यास आहेत. 17 जुलैला रात्री 9 च्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. तुमचे वीज बिल भरणा अप़डेट न झाल्याने तुमची लाईट कट करण्यात येत असल्याचा तो संदेश होता. अनिता यांनी त्या नंबरवर कॉल केला असता भामट्याने मी एमएससीबी मधून बोलत आहे. तुम्ही शेवटच्या महिन्यात वीज बिल भरले आहे, परंतू ते आमच्या सिस्टमला अपडेट होत नाही. त्यामुळे रात्री तुमची लाईट कट करणार असल्याचे सागितले.

तसेच तुम्ही आता गुगल पे वर 10 रु. पे करा असे सांगितले. अनिता यांनी 10 रुपये पे केले. त्यानंतर भामट्याने अनिता यांच्याकडे बॅंक खात्याचे एटीएम क्रमांक व युपीआय आयडी मागितला. अनिता यांनी तो दिला असता त्यांच्या बॅंक खात्यातून दोन वेळा 1 लाख रुये कट झाले. अनिता यांनी तत्काळ बॅंकेत फोन करुन एटीएम बंद करायला सांगितले होते त्यानंतरही 18 जुलैला सकाळी त्यांच्या खात्यातून तीन वेळा १ लाखाच्या आसपास रक्कम डेबीट झाले. अशा प्रकारे एकूण 1 लाख 97 हजाराची रक्कम अनिता यांच्या बँक खात्यातून डेबीट झाले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिता यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.