ठाणे - लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे साथ दिली तशीच साथ जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला देईल. असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई महायुतीचे उमेदवार आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला. ठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रचारासह प्रसार माध्यमांसाठी सोईचे ठरावे यासाठी तयार करण्यात आलेल्या भाजपच्या कोकण विभागातील दुसऱ्या मिडिया सेंटरचे उद्घाटन आज आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.