मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजवट असताना शाई धरणाबाबतची सूचना केली होती. त्यावेळी आव्हाडांची सूचना शिवसेनेकडून नाकारण्यात आली होती. मात्र आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन केली. सद्यपरिस्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मंत्रीपद आहेत. त्यामुळे आता तरी मंत्री आव्हाड यांची सूचना ऐकावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
ठाणे पालिकेनं स्वतंत्र धरण उभारण्याची २००३ मध्ये सुवर्णसंधी गमावल्यानंतर झोपी गेलेल्या शिवसेनेला आता पुन्हा जाग आली आहे, अशी खरमरीत टीका पवार यांनी केली आहे. २००३ मध्ये स्वतंत्र धरण नाकारण्यात आलं. त्यानंतर जुलै २०१६ मध्ये पुन्हा स्वतंत्र धरणाच्या सत्ताधारी शिवसेनेनं डरकाळ्या फोडल्या होत्या, मात्र आता पुन्हा चार वर्षांनंतर धरणासाठी फुकाची बडबड केली जात आहे. ती कृती शून्य असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
चितळे आणि गोडबोले समितीनं राज्यात कोठे धरणे असावीत याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालात ठाणे ही नगर परिषद असल्यानं शाई धरण मुंबईला देण्याचे ठरवण्यात आलं होतं. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात हे धरण ठाण्यासाठी राखीव ठेवलं गेलं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडूनही धरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्याकाळात जितेंद्र आव्हाड यांनीही शाई धरण विकत घ्यावे, असे सत्ताधारी शिवसेनेला सुचवलं होतं.
४५० कोटी रुपयांत हे धरण मिळत होते, तर या धरणाच्या सर्वेक्षणासाठी ठाणे पालिकेनं २००७ मध्ये ७१ लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र ठाणे पालिकेनं धरणाबाबत गांभीर्यानं भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर एका अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र धरण घेण्याऐवडी MMRDनं धरणाचे काम करण्याचं सूचवलं होतं. त्यामुळे आता या गोष्टीकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.
Listen NCP Leader Jitendra Awhad suggestion BJP demand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.