Jitendra Awhad: अक्षय शिंदेची जी हत्या झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...; आव्हाडांकडून ऑडिओ क्लिप ट्विट

Akshay Shinde murder or enounter: पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, त्यामुळे त्याचे एन्काऊंटर करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad
Updated on

मुंबई- बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, त्यामुळे त्याचे एन्काऊंटर करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी या एन्काऊंटरबाबत संशय व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील या एन्काऊंटरबाबत संशय आहे. त्यांनी हा एन्काऊंटर नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. याच संदर्भात त्यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. एन्काऊंटरची घटना प्रत्यक्ष पाहणारा व्यक्ती म्हणून त्यांनी ही क्लिप सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपची पुष्टी 'सकाळ माध्यम' करत नाही.

Jitendra Awhad
Akshay Shinde Funeral: एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे का करत आहेत दफन? कुटुंबीयांनी का घेतला असा निर्णय?

ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे संभाषण ऐकायला मिळत आहे. यात ५ मिनिट ११ सेकंदाचे संभाषण आहे. यात एक व्यक्ती त्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती देत आहे. ओडिओमधील व्यक्ती कोण आहेत, हे समजू शकलेलं नाही. जाणूनबुजून ती हत्या करण्यात आली असं ऑडिओमधील व्यक्ती म्हणत आहे. तसेच, हत्येचे ठिकाणी देखील वेगळे होते असं व्यक्ती म्हणत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका... निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती.

Jitendra Awhad
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे याचे वकिल आणि कुटुंबियांची पोलिस संरक्षणाची मागणी

दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं होतं. सदर प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. आरोपीला अटक करण्यात आली होती. पण, पोलिसांच्या ताब्यात असतानाच अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.