राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकून इंग्रजांची आठवण झाली : सोमय्या

रवी राणादेखील मानसिकदृष्ट्य खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.
किरीट सोमय्या
किरीट सोमय्या सकाळ
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनाचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याची आज तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारांसाठी भरती करण्यात आले आहेत. दरम्यान, रवी राणा (Ravi Rana) यांची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रवी राणा आणि भाजप नेते किरीट सोमय्यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राणा यांचे तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर मला इंग्रजांची आठवण झाल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणादेखील मानसिकदृष्ट्य खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले. (Kirit Somaiya Meet Navneet Rana In Hospital)

किरीट सोमय्या
Video : कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान

सोमय्या म्हणाले की, नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या संपूर्ण चाचण्या करण्यास सांगितले असून, त्यांच्या आवश्यक ते उपचार सुरु करण्यात आले आहेत. उद्या आणखी काही चाचण्या कराव्या लागणार आहेत. रवी राणा यांना रूग्णालयात दाख होण्याची जरी गरज नसली तरी घडलेल्या या सर्व प्रकारानंतर त्यांनादेखील खूप मोठा धक्का बसल्याचे सोमय्या म्हणाले. राणांचे तुरुंगातील अनुभव ऐकले आणि इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाल्याचे सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणार बदल? सर्व मंत्रालयांकडून मागवल्या सूचना

नवनीत राणांना सपॉडेलायटीसचा त्रास आधीपासूनच होता. परंतु, त्यांना ज्या पद्धतीने फरसीवर झोपवले, चौकशीसाठी बसवून ठेवले त्यामुळे त्यांचा त्रास अधिक बळावल्याचे सोमय्या म्हणाले. दरम्यान, तुरुंगातून सुटका होताच रवी राणा यांनी लीलावतीमध्ये धाव घेत पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात आश्रू होते हे आश्रू पत्नीच्या प्रकृतीच्या काळजीपोटी होते असे सोमय्या म्हणाले. तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर राज्यातील या माफिया सरकारच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देवो हीच अपेक्षा असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.