मुंबईमधील एका न्यायालयात बलात्काराचे आरोप झालेल्या व्यक्तीच्या जामीनावर सुनावणीदरम्यान एक वेगळाच प्रकार उजेडात आला आहे. या आरोपीने कोर्टात त्या व्यक्तीने पार्टनरसोबत केलेले लिव्ह इन् रिलेशनशिपचे अॅग्रीमेंट सादर केले आहे. यासोबतच त्याने दावा केला की दोघांनी एकत्र राहण्याआगोदर मिळून निर्णय घेतला होता की ते एकमेकांविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप करणार नाहीत. यानंतर तो व्यक्ती अटक होण्यापासून बचावला आहे.