VIDEO! नालासोपाऱ्यात मुंबईकडे जाणारी लोकल रोखली; सर्वसामान्य प्रवासी संतप्त 

VIDEO! नालासोपाऱ्यात मुंबईकडे जाणारी लोकल रोखली; सर्वसामान्य प्रवासी संतप्त 
Updated on


 वसई - सामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी यासाठी  नालासोपारा येथे अचानक रेल्वे ट्रॅकवर उतरून अत्यावश्यक सेवेची मुंबईकडे जाणारी लोकल प्रवाशांनी रोखून धरली याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवाशांना बाजूला केले. ही घटना ( ता. 22) सकाळी 8 च्या सुमारास घडली.

लॉकडाऊन झाल्यापासून लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली नाही . लॉकडाऊन शिथिल केल्यावर तरी लोकल सुरु होतील अशी आशा होती मात्र शासकीय , अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येत असून , अन्य प्रवासी खाजगी वाहने किंवा बसने ये जा करत आहेत वसई ते मुंबई असा प्रवास परवडत नाही भाडे भरणे , कर्ज , घरातील अन्य खर्चासहा आता प्रवास खर्च देखील वाढला आहे. रेल्वे व राज्य शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करावी याकडे प्रवाशांनी रेल्वे रोखुल लक्ष वेधले. सकाळी घटना घडली असून प्रवाशांना त्वरित ट्रॅकच्या बाहेर काढण्यात आले.त्यानंतर लोकल पुढे निघाली अशी माहिती रेल्वेने दिली.

यामुळे प्रवाशांची मागणी 
नालासोपारा बस स्थानकातून मुंबईकडे जाण्यासाठी बसेस सुटतात मात्र अनेकदा उशीर होतो त्यामुळे प्रवाशांनी थेट नालासोपारा पश्चिम येथून रेल्वे स्थानकावर मोर्चा वळवला त्यांतर आम्हालाही लोकलने जाऊ द्या अशी मागणी केली नंतर मुंबईकडे जाणारी सकाळी आठची लोकल थांबविण्यासाठी थेट ट्रॅकवर प्रवासी उतरले.

एसटी बस सेवा विस्कळीत झाल्यामुळे संतप्त नागरिक 8.25 च्या सुमारास नालासोपारा स्टेशनमध्ये शिरले. जमावाने 8.27 ला फलाट क्रमांक एक वरची लोकल ट्रेन अडवली. रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हा जमाव शांत झाला. 8.45 मिनीटाने परिस्थिती निवळली आणि लोकल रवाना झाली.

जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

---------------------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.