Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या; आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!

latest Mumbai Local News: काही गाड्या दादर स्थानकातून मार्गस्थ केल्या जाणार आहेत.
Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या;  आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!
Updated on

Mumbai Local News: मध्य रेल्वेने कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी व रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. पहिला ब्लॉक सहा तासांचा तर दुसरा ब्लॉक तीन तासांचा असणार आहे.

त्यामुळे सीएसएमटीहून रात्री ११.४२ची टिटवाळा ही शेवटची लोकल आणि हार्बर मार्गावरील रात्री ११.३०ची सीएसएमटीहून पनवेलला जाणारी शेवटची लोकल असणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर, पनवेल रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या;  आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!
Mumbai News: धक्कादायक घटना! मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांवर गंभीर आरोप

मध्य रेल्वेने कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी-रविवारी रात्री सहा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवार मध्यरात्री बारापासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत असणार आहे.

तर, दुसरा ब्लॉक रविवारी मध्य रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे. या दोन्ही ब्लॉक कालावधीत भायखळा आणि सीएसएमटी तसेच हार्बर लाइनवर वडाळा रोड आणि सीएसएमटीदरम्यान उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहे.

Mumbai Local Mega Block:मुंबईकरांनो लक्ष द्या;  आजपासून दोन दिवस विशेष मेगाब्लॉक!
Navi Mumbai: 4 लाखांची लाच घेणारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अडकला एसीएबीच्या जाळ्यात

मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत/ पासून शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट केल्या केल्या जातील. दरम्यान, अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या दादर स्थानकातून मार्गस्थ केल्या जाणार आहेत.

..

रविवारी दिवसा प्रवाशांना दिलासा

कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर उभारण्याच्या कामासाठी शनिवारी-रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतल्याने मध्य रेल्वेने रविवारी घेण्यात येणारा नियमित मेगाब्लॉक रद्द केला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेनेही रविवारचा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी दिवसा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा

Related Stories

No stories found.