Mumbai Local Update : मुंबई-ठाण्यातील पावसाचा रेल्वे सेवेला फटका! बदलापूरहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल १० ते १० मिनिटे उशिराने

Mumbai rains impact local trains : गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहरात पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 local trains
local trains
Updated on

मुंबई शहर आणि परिसरात पाऊस सुरू झाल्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-ठाणे येथे होत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वहातूक मंदावली असून बदलापूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनीटांनी धावत आहेत. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहरात पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहरात रिमझीम तर उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. आज आणि उद्या संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि पालघर या विभागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 local trains
Mumbai Water Supply: मुंबईत आज पाणीबाणी! तानसा मुख्य जलवाहिनीला गळती; कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद? जाणून घ्या

आज कुठे पाऊ होणार?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 24) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह उपनगरातही आज पावसाचे पुनरागम होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

 local trains
Shikhar Dhawan's Retirement: शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, पाहा पोस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.