मुंबई: लॉकडाऊनमुळे (Lockdown Effect) हातावरचे पोट असलेले तरुण पैशांसाठी गैरमार्ग अवलंबत असल्याचं निदर्शनास आले आहे. मुंबईत कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर सर्वत्र निर्बध लादण्यात आले आहेत. त्यामुळे फेरीवाले, रस्त्यावर खेळणी विक्रेत्यांना परवानगी नाहीय. मागच्या तीन महिन्यांपासून त्यांचे व्यवसाय बंद आहेत. (Lockdown Effect Street hawker turns into drug smuggler in mumbai)
काम बंद आणि हातात पैसा नसल्यामुळे हे तरुण आता गैरमार्गाचा अवलंब करत आहेत. घरात पैशांची चणचण आहे हे लक्षात घेऊनच देवनार परिसरातील एका फेरीवाल्याने चक्क ड्रग्ज तस्करी सुरू केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
जावेद खान असे या आरोपीचे नाव असून तो धारावी परिसरात राहतो. जावेद १६ जूनच्या रात्री देवनार परिसरात ७५० ग्राँमची तस्करी करण्यासाठी आला होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखा १० चे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहिद पठाण याला त्याच्यावर संशय आला.
जावेदला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याजवळ ७५० ग्रँम चरस मिळून आले. बाजारात त्याची किंमत २२ लाख ५० हजार इतकी आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.